कुत्र्यांच्या टोळीच्या हल्ल्याला घाबरून बैल घराच्या गच्ची वर चढला. ज्यामुळे ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण झाले होते. नंतर सुरक्षित बैलाला खाली उतरवण्यात ग्रामस्थांना यश आले.
Viral Video Of Ox :-
सध्या प्राण्यांचे बरेच व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. देशभरात सध्या कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला वाढत आहे. यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा अनेकदा जीव धोक्यात आला आहे. आता त्यापासून इतर प्राणी सुद्धा सुटलेले नाहीत. असाच एक विडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडियो मध्ये बैल कुत्र्यांच्या भीती पोटी सांड घरावर चढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील निराल गावातील असल्याची माहिती खात्रीशीर मिळते. व्हायरल व्हिडिओ मध्ये सांड घराच्या वर उभा दिसत असून, घर कवेलू च आहे.
खरंतर, बैल हा अत्यंत रागिष्ठ प्राणी आहे. एकदा जर त्याला राग आला की तो कोणालाही शिंगावर घेण्यास मागे पुढे पाहत नाही. परंतु, हाच बैल चक्क कुत्र्यांच्या टोळीचा सामना करू शकला नाही. टोळीला घाबरून बैल चक्क घरावर चढला. ऐकावं ते नवलच.
मिळालेल्या माहितीनुसार, हा बैल शेतकरी शेख गफुर यांच्या मालकीचा असून, कुत्र्यांच्या हल्ल्याला घाबरून बैलाने बांधलेली दोरी तोडून, घराच्या गच्चीवर धाव घेतली. अचानक घडलेल्या घटने मुळे गावकरी अस्वस्थ झाले. त्यानंतर त्या बैलाला सुखरूप घराच्या गच्चीवरून खाली उतरवण्यात यश आले.
बैलाला घराच्या गच्चीवर बघताच गावकऱ्यांनी व्हिडिओ शूट करून, समाज माध्यमां वर पोस्ट केला. ज्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला.
तेलंगाना के आदिलाबाद जिले के निराल गांव में एक अनोखी घटना देखने को मिली, जहां आवारा कुत्तों के झुंड से बचने के लिए एक सांड घर की छत पर चढ़ गया। अचानक हुए इस नजारे से ग्रामीण हैरान रह गए। बताया गया कि शेख गफूर नामक किसान का सांड कुत्तों के हमले से घबराकर रस्सी तोड़कर भागा और… pic.twitter.com/e6cCrhW7IA
— KHABAR FAST (@Khabarfast) September 16, 2025

0 टिप्पण्या