खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षण विरोधात वक्तव्य केल्याने देशात असंतोषाचे वातावरण झाले आहे. ज्यामुळे समाज माध्यमांवर या वक्तव्या विरोधात नाराजी ओसंडून वाहत आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज अंबेडकर यांनी या वक्तव्या विरोधात सुप्रिया सुळेंना खडेबोल सुनावले.
Anandraj Ambedkar Aggressive Against Supriya Sule :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षण बद्दल बोलत वादग्रस्त विधान केले होते. एनडीटीव्ही च्या युवा २०२५ च्या कार्यक्रमात बोलत असताना ३ दिवसां पूर्वी त्यांनी वक्तव्य केले. यावर आता समाज माध्यमां वर अनेक आरक्षणवादी विरोधात प्रतिक्रिया नोंदवत आहेत. अशातच रिपब्लिकन सेना पक्षाचे प्रमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी याविरोधात सुप्रिया सुळेंना खडेबोल सुनावले आहे.
काय म्हणाले आनंदराज अंबेडकर ?
" या देशात आजही जातीय व्यवस्था असून, तथाकथित सवर्ण हजारो वर्षाचं आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्यांचं आरक्षण रद्द करण्याबद्दल कोणी वक्तव्य करत नसून, जातीय आरक्षण रद्द करण्याची मागणी करत आहेत. लोकप्रतिनिधी च्या माध्यमातून केली जाणारी वक्तव्य दुर्दैवी आहे. कित्येक वर्ष ज्ञान आणि संपत्ती यापासून दलीत आणि आदिवासींना वंचित ठेवलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब आणि कष्टकरी यांना आशेचा किरण दाखवला."
काय वक्तव्य केलं सुप्रिया सुळे यांनी ?
तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले, " आरक्षण गरजू व्यक्तींना दिल्या गेलं पाहिजे.मी शिक्षित आहे. माझे मुलं शिक्षित आहेत. असं असताना जर मी आरक्षणासाठी अर्ज करत असेल तर, मला लाज वाटायला पाहिजे. आरक्षण आर्थिक निकष आधारित असायला पाहिजे. ज्यामुळे गरजू व्यक्तींना त्याचा लाभ होईल."
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी केलेले “आरक्षण आर्थिक निकषावर असावे” हे विधान अतिशय उथळ आणि दिशाभूल करणारे आहे.
— Anandraj Ambedkar (@AnandrjAmbedkar) September 23, 2025
सुप्रिया सुळे यांनी त्वरित आपले विधान मागे घ्यावे.#Reservation #Constitution #AnandrajAmbedkar #SupriyaSule #JaiBhim pic.twitter.com/NcqYbpnvox

0 टिप्पण्या