Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातील शहरांचा आराखडा आखणे आवश्यक राज ठाकरे

 



दोन चाकी वाहनं सिग्नल पाळत नसून, पूर्वी रात्री 12 वाजता सिग्नल सुरू असेल तरी गाड्या थांबत होत्या. आता दुपारी 12 वाजले तरी पण थांबत नाही. कायद्याला न जुमाननं आणि कायदा केला तरी आम्ही आमच्या मर्जीनुसार वागणार याच्यातून शहरं उभी राहणार नसून, वाईट गोष्टींकडे आपण जाऊ. अत्यंत विचित्र चित्र भविष्यात मला दिसत आहे जर आता याच्यावर उपाययोजना सरकार कडून झाल्या नाहीत. तर त्याप्रकारची बेशिस्ती अजून वेगळ्या वेगळ्या बाबतीत निर्माण होईल. मग जर ते एकदा हाताबाहेर गेलं तर कोणीच काहीच करू शकणार नाही. प्रत्येक ठिकाणी नियम असतात. तसे शहरांचे पण काही नियम असतात. कश्या प्रकारे गाड्या चालवावी, कुठे गाडी उभी करायला पाहिजे, यासाठी शहरांचा आराखडा आखला पाहिजे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे म्हणाले. 







आता जर गाड्यांचे दर (rate) पाहिलेत, तर पार्किंगचे दर परवडायला हरकत नाही. महिन्याला दोन हजार, 3 हजार असतील तर तुमची गाडी सेफ राहते. गाडी रस्त्यावर (पार्किंग) उभी ठेवली तर कोणाला त्रास होत नाही. सगळ्याच गोष्टी फुकट मिळू शकत नाही. रस्त्यावर जे गाडी पार्क करता ते स्क्वेअर फूट मध्ये मोजायचे का ? ट्रॅफिक ची समस्या सोडवली गेली नाही तर शहरं बर्बाद होण्याचे सूतोवाच त्यांनी केले. 


पूर्वी  जिकडे ५० माणसं राहत होती. त्याठिकाणी ५०० माणसं त्याच जागेत राहत आहेत. लोकसंख्या वाढलेले असून, त्यांच्या गाड्या वाढलेल्या आहेत. आणि सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आलेल्या आहेत. रस्ते कमी असून, ट्रॅफिक ला शिस्त नाही. कोणीही कुठेही गाड्या पार्क करत आहेत. यावर सरकारने लवकर तोडगा काढण्याची गरज आहे असेही राज ठाकरे म्हणाले. 


       प्रसारमाध्यमांशी चर्चा करण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वाढत्या ट्रॅफिक ला आटोक्यात कसं आणता येईल याबद्दलचा आराखडा त्यांनी मुख्यमंत्री समोर मांडला. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः प्रसार माध्यमांना दिली. 

      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या