इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आज दाखल केला अर्ज.
नवी दिल्ली :-
उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आज गुरूवार रोजी नामांकन भरला. राज्यसभा सचिवालय येथे त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. रेड्डी यांनी चार सेटमध्ये आपला अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह २० नेते प्रस्तावक झाले. याप्रसंगी राहुल गांधी , मल्लिकार्जुन खडगे, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, शिवसेना नेते संजय राऊत आणि इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. निवडणुकीचे निवडणूक अधिकारी असलेले राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
![]() |
फोटो सोर्स पि सी विष्णुनाध यांच्या एक्स अकाउंट वरून घेतलेला आहे. |
नामांकन अर्ज दाखल करण्या अगोदर त्यांनी संसदेच्या परिसरातील सरदार पटेल, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. आजची नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर, 25 ऑगस्ट ला नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे.
माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचे कारण सांगत राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्याच्या काही दिवसांतच निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाची निवडणुक जाहिर केली.
बी सुदर्शन रेड्डी हे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश व गुवाहाटी उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश होते. कालच राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी (NDA) चे उमेदवार सी पि राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज भरला. यंदाच्या या उपराष्ट्रपती निवडणूकीत दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना रंगणार आहे. सी पी राधाकृष्णन तामिनाडूमधील आणि बी सुदर्शन रेड्डी तेलंगणा राज्यातील आहेत.
बी सुदर्शन रेड्डी यांची प्रतिक्रिया
आज, मला विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मान मिळाला. मी हे नम्रता, जबाबदारी आणि आपल्या संविधानात समाविष्ट असलेल्या मुल्यां प्रती अढळ वचनबद्धते च्या खोल भावनेने केले.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि न्याय, समानता आणि सुसंवादासाठी या सामूहिक संघर्षाला प्रेरणा देणाऱ्या असंख्य नागरिकांचे मी मनापासून आभारी आहे. आपल्या संविधानावर विश्वास ठेवून आणि आपल्या लोकांवर आशा ठेवून, मी या प्रवासाला सुरुवात करतो. आपली लोकशाही भावना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत राहो.
![]() |
नामांकन अर्ज भरल्या नंतर बी सुदर्शन रेड्डी यांच्या वक्तव्याचे पत्रक काँग्रेस चे नेते जयराम रमेश यांनी एक्स वर पोस्ट केले. |
0 टिप्पण्या