मंत्रिमंडळ निर्णय रायगड :-
तुम्ही जर रायगड जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे टाटा मेमोरियल सेंटर एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
असंख्य गरीब रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार गरजुंना व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने १०० खाटांचे रुग्णालयासाठी लागणारी जमीन प्रतिवर्षी १ रुपये दराने देण्याचा निर्णय घेतला असून, जमिनीच्या करारनाम्या वरील मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी अशी विनंती टाटा मेमोरियल सेंटरने केली होती. या विनंतीला अनुसरून करारनाम्या वरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयातील १०० टक्के खाटां पैकी १२ टक्के खाट गरीब व दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठी राखीव असणार आहे. शासकीय योजनेनुसार सवलतीच्या दरात कर्करोगावर उपचार उपलब्ध होणार असून, रुग्णा सोबतच्या एका व्यक्तीसाठी अत्यल्प दरात रहिवासी सेवा सुविधा उपलब्ध होणार असल्याची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली.
0 टिप्पण्या