सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी गट ब पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना प्रथम नियुक्ती पत्रांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले.
![]() |
फोटो सोर्स CMO Maharashtra यांच्या फेस बुक अकाऊंट वरून घेतलेला आहे. |
सर्वांगीण विकास साकारू शकणार नाही!
सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून, समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते. समाजातील वंचित घटक जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत आपण सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकारू शकणार नाही. आपण सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजातील वंचित घटकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, राज्याच्या विकासात आपले योगदान महत्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ - मुंडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या