Hot Posts

6/recent/ticker-posts

"आरएसएस च्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी लावली हजेरी" "नंतर दिलं स्पष्टीकरण"

 

राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आरएसएस महिला युनिट च्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यावरून त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.


    




देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 100 वर्ष पूर्ण केल्याने देशभरात तसेच महराष्ट्रातील नागपूर येथे जय्यत तैयारी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या राज्यसभा खासदार व महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्री व लोकसभा खासदार कंगना राणावत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी " राष्ट्र सेविका समिती " या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे राजकारणात आणि नेतकऱ्यांमध्ये संताप पहायला मिळाला होता. 


सोर्स फोटो अभिनेत्री कंगना राणावत यांच्या एक्स अकाउंट वरून घेतला आहे. 



       "राष्ट्र सेविका समिती" ही "राष्ट्रीय स्वयंसेवक संघा" ची महिला युनिट आहे. कंगना राणावत यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली. त्या पोस्ट मध्ये त्या भाषण देत असल्याचे दिसून येत आहे. फोटो व्हायरल झाला तसा अनेकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. 

         

                    अजित पवार म्हणतात

अजित पवार यांनी या प्रकरणावर बोलत असताना म्हणाले की, माझी बायको कुठे जाते हे मला माहीत नसते. वर्धा जिल्ह्यात आले असताना त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी उत्तर दिली. 

     

           रोहित पवार यांनी नोंदवला आक्षेप

 अजित पवार सत्तेचे वाटेकरी झाले असून, त्याचे कारणं वेगळी आहेत. तिथे गेल्या नंतर त्यांचे विचार स्वीकारले नसतील. परंतु, एखाद्या बैठकीला या असा त्यांच्यावर दबाव असेल. कुठेतरी हे आरएसएस चा संदेश स्वीकारायला लागले हा संदेश लोकांमध्ये गेला पाहिजे. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस च्या बैठकीला जाता ही दुटप्पी भूमिका आहे आणि ही भूमिका लोकांना नकोय.



           सुनेत्रा पवार यांच स्पष्टीकरण 

 

     माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या