Hot Posts

6/recent/ticker-posts

"भाजपला डूप्लिकेट शिवसेनेचा मतं फुटण्याची भीती संजय राउतांचा दावा" " क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तवली"


उद्धव ठाकरे यांनी सी पि राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा यासाठी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी फोन केला असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.




तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात आणि आता त्याच   पक्षाकडे मतं मागत आहात. आपल्याकडे बहुमत आहे असं भाजप म्हणते.  तर, तुम्हाला  मतं मागण्याची गरज नाही. तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार आहे का ?  तुमची मतं फुटेल? किंवा डूप्लिकेट शिवसेना चे मतं फुटतील, अशी तुम्हाला भीती वाटत आहे का ?  असा प्रश्न संजय राऊत यांनी सरकारला विचारला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले.






         हुकूमशाही विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलेला


              मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या सांगण्यासाठी फोन केला. परंतु, उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतलेली असून, हुकूमशाही विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही या फोन कडे एक शिष्टाचार म्हणून बघत आहोत. 

 

                      क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता 

       

आज राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी चे बहुमत कागदावर दिसत असून, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश चे नेते अस्वस्थ आहेत. ज्या पद्धतीने आम्ही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाचे उमेदवार असताना हिंदुहृदयसम्राट बालासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. अश्याप्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणा चे नेते घेतील का अशी भीती भाजपला वाटत आहे. राहुल गांधी यांनी देशभरात केलेल्या वातावरणामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे असेही राऊत म्हणाले.


            राज्यपाल  राज्याचा प्रथम नागरिक 


    देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चानक्यनीती शिकवू नये. राज्यपाल महाराष्ट्राचे मतदार आहेत. तर त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे, लुंगी कशाला नेसता. कुठलाही राज्यपाल त्या राज्यात असताना तो त्या राज्याचा प्रथम नागरिक असतो. हे आम्हाला माहिती असून, आम्ही घटनेचं पालन करत आहोत. ते घटना पायदळी तुडवतात. राज्यपाल या राज्याचे मतदार असून, नागरिक नाहीत. आता यापुढे ते राज्याचे मतदार नसतील तर ते दिल्लीचे असणार आहेत. राष्ट्रीय लोकतांत्रिक दल (एनडीए) ने मराठी माणूस दिला असता तर त्याच्यावर चर्चा झाली असती. आता ते शक्य नाही. 


       हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती च ढोंग समोर आलं


अमित शहांचे पुत्र क्रिकेट चे सूत्रधार असल्याने मीटिंग पासून ते चिटींग पर्यंत पैश्यांचे खेळ असल्याने क्रिकेट आणि रक्त मैदानावरती तुम्हाला एकत्र दिसेल अश्या प्रकारचे ढोंग भाजप आणि राष्ट्रभक्ती चे ढोंग या सामन्यात समोर आलं आहे. 


        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या