Hot Posts

6/recent/ticker-posts

"सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन" "पोलीस महासंचालक यांनी केली तीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती"

 

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्ये प्रकरणी उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश एका आठवड्या पूर्वी राज्याचे पोलिस महासंचालकांना दिले होते. त्यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष तपास पथक (SIT) ची घोषणा केली आहे. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. 

      या विशेष तपास पथक मध्ये तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले आहे. सुधीर हिरेमठ विशेष तपास पथक (SIT) चे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर, अभिजित धाराशिवकर आणि अनिल गवाणकर यांची नियुक्ती केलेली आहे. सुधीर हिरेमठ यांची नुकतीच पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे रुजू झालेले अधिकारी आहेत. मात्र या तपास पथकात परभणी जिल्ह्यातील अधिकारी वा कर्मचारी या प्रकरणात लक्ष घालणार नाही, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत.






          डिसेंबर महिन्यात परभणी शहरात संविधान प्रतिकृती अपमान झाल्याच्या विरोधात हिंसाचार उसळला होता. पोलीसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत अनेकांना अटक केली होती . तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा समावेश करण्यात आला होता. त्याचवेळी त्यांच्या निधनाची बातमी समाज माध्यामांवर व्हायरल झाली होती. सभागृहात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्र्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे सांगितले होते. त्यांच  कथन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री यांंनी खोडून काढला होता. त्यांचा नंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि उच्च न्यायालयाने 7 दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आरोपींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत याचिकाकर्त्यांना दिलासा दिला. 

              उच्च न्यायालयात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यु प्रकरणी त्यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यांचे वकील म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर न्यायालयात बाजू मांडत आहेत. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्याचे पोलिस महासंचालक यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून पुढील तपासासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. आता पुढे तपास पथक तपास कसा करतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहेत. 

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या