Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यायालय निवडणूक आयोगाला प्रश्न का विचारत नाही? प्रकाश आंबेडकर

 



Vanchit Bahujan Aaghadi :-

२२ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) बिहार येथे सुरू असलेल्या प्रकरणाच्या सुनवाई दरम्यान SIR सारख्या गंभीर मुद्द्यांवर न्यायालयात किती राजकीय पक्षांनी हस्तक्षेप नोंदवला आहे आणि सुप्रीम कोर्टात राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेत राज्यस्तरीय पक्षांना का सोबत घेतलं नाही असे महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे. त्यालाच अनुसरून प्रकाश अंबेडकर यांनी समाज माध्यामांवर पोस्ट केली. सायंकाळी ५ वाजल्यानंतर झालेल्या ७६ लाख मतांच्या विरोधात न्यायालय निवडणूक आयोग ला प्रश्न का विचारत नाही? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर न्यायालयाला केला. 








          प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले , " वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र निवडणूकित झालेल्या हेराफेरी च्या विरोधात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायलयात कायदेशीर लढा दिला. ही लढाई लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० पेक्षा जास्त राजकीय पक्षांना पत्र लिहत निष्पक्ष निवडणुकीच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले होते. कोणताही एक पक्ष निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर शंका उपस्थीत करू शकत नाही ".


       " काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि राहुल गांधी यांना न्यायालयीन लढ्यात सोबत येण्यासाठी पत्र लिहून विनंती केली. सर्व राजकीय नेत्यांनी काहीच प्रतिसाद दिला नसून, माध्यमांसमोर येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलत आहेत. परंतु, आता विरोधकांनी उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाची पोल खोलण्याची संधी गमावलेली असून, ही लढाई कुठल्याही एका पक्षाची नसून, सर्व राजकीय पक्षांची आहे ", अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या