Hot Posts

6/recent/ticker-posts

"आता वीस वर्षा पर्यंत चालवू शकाल गाड्या" "केंद्र सरकारने काढली अधिसूचना"

 



१५ वर्ष जुनी गाडी ला आता अधिकचे ५ वर्ष केंद्र सरकार तर्फे मुदतवाढ देण्यात आले आहे. तशी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे.



News for १५ Year Old Vehicle:-


तुम्ही जर गाडी 15 वर्ष उलटल्या नंतरही चालवत असाल, तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने जुन्या वाहनांसाठी महत्त्वपूर्ण बदल केला असून, रस्ता, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 15 वर्षां पेक्षा जास्त जुनी गाडी वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 







      

     नवीन नियमांनुसार, आता गाडी मालक आता 20 वर्षासाठी गाडीची नोंदणी करू शकतील. यासाठी आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. पूर्वी हा नियम, 15 वर्षां करिता होता. आता तो २० वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे म्हणजेच ५ वर्षांची अतिरिक्त वाढ देण्यात आली आहे. या नियमाला (Central Motar Vehicle) तिसरी दुरुस्ती २०२५ असे म्हणतात. यानुसार गाडी मालकांना आता २० वर्षां पर्यंत गाडी अधिकृतरित्या वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन नियम वस्तू आणि सेवा कर यामधून वगळण्यात आला आहे. 


    दिल्ली आणि एनसीआर  नियम लागू होणार नाही

   संपूर्ण देशातील गाडी मालकांना २० वर्षांपर्यंतची सुट देण्यात आली असून, एनसीआर आणि दिल्ली या ठिकाणी हे नियम लागू होणार नाही. याठिकाणी आधीच प्रदूषण खूप जास्त आहे आणि येथे जुन्या गाड्यांवर बंदी आहे. त्यामुळे तिथे नियम लागू होणार नाही 


      वाहन प्रकारां नुसार शुल्क आकारले जाणार


अवैध वाहतूक (Invalid Carriage) साठी १०० रुपये, मोटर सायकल साठी २००० रुपये, तीन चाकी आणि चौकोनी सायकल साठी ५००० रुपये, हल्की मोटार वाहने साठी (कार) १०००० रुपये, इम्पोर्टेड मोटार गाडी दुचाकी किंवा तीनचाकी साठी २०००० रुपये, इम्पोर्टेड मोटार वेहिकल तीनचाकी किंवा त्यापेक्षा जास्त साठी ८०००० रुपये तर इतर उरलेल्या गाड्यांवर १२००० शुल्क आकारले जाणार आहेत. 

         हा नियम सर्वसामान्य कुटुंबासाठी महागडा असून, परवडणारा नाही. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या