Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री यांच्या हस्ते जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन

 

छत्रपती संभाजी नगर :- 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 23 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर फारोळा येथील  अटल अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पा नुसार जलवाहिनी व 26 दश लक्ष लिटर  क्षमता असणार्‍या  जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन पार पडले. 










याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , 

" छत्रपती संभाजीनगर शहरात 2050 पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी ₹1800 कोटींच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा काही खर्च छत्रपती संभाजीनगर महापालिकेला करावा लागणार होता; परंतु लोकप्रतिनिधींनी केलेल्या विनंतीनुसार दुसरी ऑर्डर काढून महानगरपालिकेचा खर्च महाराष्ट्र शासनाने उचलला. "





पुढे म्हणाले,

" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अटल अमृत योजनेचा भाग असल्याने योजना राबविली जात आहे. योजनेत सुधारणा करून ती पुनुरुज्जीवित करण्यात आली आहे.  योजनेची एकूण किंमत 2700 रुपये कोटी इतकी वाढवली आहे. काम अत्यंत वेगाने सुरू असून, योजनेचे 82% काम पूर्ण झाले. "






  योजना पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराला पुढील 25 ते 30 वर्षे 365 दिवस आणि २४ तास पाणीपुरवठा उपलब्ध होईल. महानगरपालिकेचा 800 कोटी रुपयांचा हिस्सा 'HUDCO' च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून, योजनेचे काम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी, मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या