पक्षाची मतं चोरली जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना :-
मतदाना मध्ये झालेल्या फेरफार विरोधात 2017 पासून आवाज उठवत आहे. त्यादरम्यान शरद पवार, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची सुद्धा भेट घेतली. महाराष्ट्रातील नेते माझ्या सोबत आले आणि त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु, त्यावेळेस नेतृत्वाने घुमजाव केला. विरोधी पक्षातल्या नेतृत्वाला त्याच क्षणी सांगितलं होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार घातल्याने प्रतिक्रिया जागतिक स्तरावर दिसायला लागतील. बाहेरचा देश जसा दबाव निर्माण करू लागेल तेव्हाच सरकारचे डोळे उघडणार, अन्यथा डोळे उघडणार नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून मी निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचे बोलत आहे. पक्षाला मतदान होत नाही असं कार्यकर्त्यांनी समजू नये. पक्षाची मतं चोरली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
पुणे येथील मनसे पदाधिकारी बैठकीत म्हणाले.
पुढे म्हणाले,
" पक्षाला सतत पराभवाला सामोरे जावे लागत आहे. लोकांनी पक्षाला मतदान केलेलं नाही असं कार्यकर्त्यांनी समजू नये. ते सगळं खोटं आहे. पक्षाला झालेलं मतदान पक्षा पर्यंत पोहोचलेलं नाही. या सगळ्या मतांची चोरी करून सत्ताधारी सत्ते वरती आहेत."
प्रवीण दरेकर म्हणतात
याच्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही. राहुल गांधी यांनी आरोप केले. निवडणूक आयोगाने लेखी उत्तर दिलं. निवडणूक आयोगाने सांगितलं की शपथपत्र दाखल करा. त्यांनी निवडणूक आयोगापुढे सादर केलेलं नाही. सध्या राज ठाकरे यांनी आरोप केला असून, केवळ आरोप करून चालत नसतात. पुष्टी करणारी कागदपत्र द्यावे लागतात. निवडणूक आयोगाकडे त्यांनी संबंधित पुराव्याचे कागदपत्र द्यावीत. निवडणूक आयोग त्यावर काटेकोरपणे भूमिका घेईल.
0 टिप्पण्या