अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :-
यात्रा यशस्वी झालेली असून, लोकं स्वतःहुन यात्रेत सहभागी होत आहे. वोट चोरी बद्दल आम्ही बोललो होतो. परंतु, आता लाखो नाहीत तर कोटिं पेक्षा जास्त लोकं मान्य करायला लागलेले आहेत. निवडणूक आयोगाचे काम योग्य मतदार यादी देणे असून, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटक राज्यात तसं केलेलं नाही. आमचा पूर्ण प्रयत्न निवडणूक आयोगावर दबाव आणून वर्तणूक बदलवण्याचा आमचा मानस आहे, असे काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी म्हणाले.
पुढे म्हणाले, "
"निवडणूक आयोग कुठल्याही थराला गेले, तरीही बिहार मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आम्ही मतचोरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्र, हरियाणा येथे निवडणूक आयोगाने मतचोरी केली. कर्नाटक मध्ये आम्ही मतचोरी स्पष्ट दाखवलेलं आहे".
" कर्नाटकच्या महाधवापुरा मतदारसंघाचं निवडणूक आयोगासमोर ब्लॅक अँड व्हाइट डाटा ठेवला. वाढीव १ लाख मतदाता आले कुठून? विचारलेल्या प्रश्नाचं आजपर्यंत निवडणूक आयोगाने उत्तर दिलेलं नाही. मी पत्रकार परिषदेत उपस्थित असताना निवडणूक आयोग म्हणते की, राहुल गांधींना शपथपत्र द्यावे लागेल आणि शपथपत्र नाही दिलं. तर, आम्ही स्वीकारणार नाही. काही दिवसांत सरकारचे अनुराग ठाकूर तशीच पत्रकार परिषद घेतात. आम्ही जे म्हणत होतो त्यालाच अनुसरून अनुराग ठाकूर बोलले. परंतु, निवडणूक आयोग त्यांना शपथपत्र मागत नाही. माध्यमांना माहिती आहे की हा निवडणूक आयोग कोणासोबत उभा आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष नाही, " अशी टीका निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी केली.
बिहार मध्ये SIR प्रक्रियेला वेग धरला असून, ते संस्थात्मक चोरी करण्याची पद्धत आहे. लाखो मातदातांचे नाव त्यामध्ये कापले आहेत. विरोधक तक्रारी नोंदवत असून, भाजप एक सुद्धा तक्रार करत नाही आहे. कुठेही त्यांनी म्हटलं नाही की मतदाता यांचे नाव कापले जात आहे. हे खरं आहे की मतदात्यांचे नाव कापले जात आहेत. ६५ लाख मातदात्यांचे नाव कापले गेले असून, भाजप गप्प आहे. कारण भाजप, निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त यांच्या मध्ये भागीदारी (Partnership) आहे, असेही ते म्हणाले.
बिहार राज्यातील अरारिया येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले. "वोटर अधिकार यात्रे" निमित्त ते अरारिया येथे आले होते. .
0 टिप्पण्या