खासदार असदुद्दीन ओवेसि यांनी बी सुदर्शन रेड्डी यांना दिला पाठींबा. तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या विनंतीवरून पाठिंबा केला जाहीर. तर, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने एनडीए आघाडीला केला पाठिंबा जाहिर.
Asaduddin Owaisi Supports INDIA Alliance :-
सध्या देशात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीचे वारे वाहत आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणुक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. अशातच काल MIM चे खासदार व सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी इंडी आघाडीचे उमेदवार व सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच समाज माध्यमांवर दिली.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या विनंती नुसार त्यांनी हा निर्णय घेतलेला असून, इंडी आघाडीचे उमेदवार न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना त्यांनी निवडणुकीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.
तर, आंध्र प्रदेश चे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने एनडीए चे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. YSR काँग्रेस चे राज्यसभा खासदार वाय वी सुब्बा रेड्डी यांनी PTI वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली.
काही दिवसां पूर्वी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी तेलगू भाषिक संबंधित मोठ्या नेत्यांना म्हणजेच पवन कल्याण, के. चंद्रशेखर राव, चंद्रबाबू नायडू आणि असदुद्दीन ओवेसी यांना इंडी आघाडीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांनी तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. दक्षिण विरुद्ध दक्षिण यंदा अशी उपराष्ट्रपती पदासाठी लढत होणार आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी पार पडणार असून, त्याच दिवशी निवडणूक आयोग निकाल जाहीर करणार आहे. आम आदमी पक्षाने काही दिवसां पूर्वी इंडी आघाडीचे उमेदवारांना पाठिंबा दिला. BRS पक्ष यंदा कुठल्या आघाडी सोबत हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
0 टिप्पण्या