विदर्भातील ११ ही जिल्ह्यांना 5 दिवसांचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने एक्स वर पोस्ट करत अंदाज वर्तवला आहे.
Monsoon Update :-
देशात सध्या पावसाचे वातावरण असून, राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. अशातच पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ०७ ते ११ असा पाच दिवसांचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला आणि पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात ०७ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांना धोका नसल्याचा इशारा हवामान विभागाने सांगितले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या नागपूर विभागाने हा इशारा दिला आहे.
पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांना ०८ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना धोका नसल्याचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
संपूर्ण विदर्भाला ०९ आणि १० सप्टेंबर रोजी दिलासा मिळण्याचा म्हणजे धोका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांना म्हणजेच वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने ११ ऑगस्ट रोजी वर्तवली आहे. तर, चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
0 टिप्पण्या