दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली मधील नियोजित कटकारस्थान (२०२०) दंगली प्रकरणी जामीन निर्णय दिला. त्याच प्रकरणी आता निकाला विरोधात शरजील इमाम, उमर खालिद आणि गुल्फिशा फातिमा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Delhi Riots Conspiracy Case :-
दिल्ली उच्च न्यायालयाने ०२ सप्टेंबर रोजी दिल्ली २०२० दंगल प्रकरणी UAPA कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या शर्जिल इमाम, उमर खालिद गुल्फिशा फातिमा आणि इतर जणांना जामीन नाकारली होती. आता श
शर्जिल इमाम, उमर खालिद आणि गुल्फिशा फातिमा यांनी उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्व आरोपी 5 वर्षां पासून तुरुंगात बंद आहेत. खंडपीठाचे न्यायमूर्ती नवीन चावला आणि शालिंदर कौर यांनी हा निर्णय दिला होता.
काय होता दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय ?
राज्यघटना नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार देते. परंतु, ते शस्त्रा शिवाय, शांततेत आणि व्यवस्थित आंदोलन करण्याचा अधिकार देते. कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन करावे. निदर्शनांच्या नावाखाली कटकारस्थान रचून हिंसा केल्या प्रकरणी नागरिकांना परवानगी देता येणार नाही असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
२०२० दंगल प्रकरणी UAPA कायद्या अंतर्गत एकूण ९ जण अटकेत आहेत. सलग 5 वर्षापासून सगळे अटकेत असून, सर्वांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता. आता ते सर्वोच्च न्यायालयाकडे आशेचे किरण म्हणून बघू लागले आहेत. त्यापैकी तिघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात उमर खालिद यांच्या तर्फे अर्ज करणार आहेत.
0 टिप्पण्या