श्रीनगर येथील दर्ग्यात देशाचे प्रतीक अशोक स्तंभ जमावाकडून फोडण्यात आले होते. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
Vadalism Of National Emblem :-
श्रीनगर च्या हजरतबल दर्ग्याच्या आत लागलेल्या दगडी पाटीवर असलेलं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ उपस्थित जमावाकडून दगडाने ठेचून फोडण्यात आले. ही घटना शुक्रवारला घडली असून, 50 जणांना सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमांवर राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ ची तोडफोड भयंकर व्हायरल झाली. त्यावरून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.
![]() |
| Photo Source ANI Media Company. |
काय आहे प्रकरण ?
जम्मू आणि काश्मीर च्या राजधानी श्रीनगर मध्ये ईद ए मिलाद च्या दिवशीच वादंग तयार झाला होता. काहीच दिवसांपूर्वी हजरतबल दर्ग्यात नूतनीकरण (Renoation) झाला होता. अशोक स्तंभ प्रतिकृती तोडणाऱ्यानी आरोप केला होता की, मस्जिद च्या आत मध्ये एक मूर्ती सारखी काही तरी लावलेली आहे. जिथे मुहम्मद पैगंबर यांचा एक अवशेष ठेवलेलं आहे. याच कारणामुळे इस्लाम धर्माला मानणाऱ्या लोकांमध्ये चीड निर्माण होऊ लागली आणि इस्लाम धर्मात मूर्तीची शिकवण नसून, त्यामुळे दगडी पाटी वरील अशोक चिन्ह जमावाने फोडले. त्यात स्त्रियांचा सुद्धा समावेश होता.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले
त्या दगडावर राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ लावायला पाहिजे की नाही हा प्रश्न तिथे उपस्थित होतो. मी आतापर्यंत कुठल्याही धार्मिक स्थळी राष्ट्रीय प्रतीक बघितलं नाही. दर्ग्याच्या आतमध्ये राष्ट्रीय प्रतीक लावलंच कशाला. असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी वक्फ बोर्डाचे प्रमुख यांना विचारला.
दरक्षान अंद्रबी यांनी दिली प्रतिक्रिया.
राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ तोडणारे राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आणि गुंडे असून, आमच्या वक्फ च्या प्रशासनावे सुद्धा या गुंडांनी हल्ला चढवला आहे. राष्ट्रीय प्रतीक फोडून आरोपींनी खूप मोठा गुन्हा केलेला आहे. आरोपींना आता दर्ग्यात कधीच प्रवेश दिला जाणार नसून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दरक्षन अंद्राबी या भाजपच्या नेत्या असून, जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्ष आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी या प्रकरणात भाष्य केले.
मी श्रीनगर मधील दर्ग्यात राजकीय चिन्ह अशोक स्तंभाच्या तोडफोडी संदर्भात निषेध व्यक्त करतो. असे त्यांनी समाज माध्यमांवर लिहिले. पुढे त्यांनी म्हटले की, " अशोक स्तंभ तोडफोडीचा समर्थन करून मुसलमान समाज स्वतःला भारतापासून वेगळे करत आहेत." असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले.
![]() |
| Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar Post on X. |


0 टिप्पण्या