Hot Posts

6/recent/ticker-posts

" राधाकृष्ण विखे पाटील मराठा समाजाची फसवणूक करत आहेत संजय लखेंचा आरोप "

 

राधाकृष्ण विखे पाटलांची तत्काळ मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी करावी असे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलक संजय लाखे पाटील यांनी केली. 


Maratha Reservation :- 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस  मराठा समाजाच्या भल्यासाठी सांगत नसून, ओबीसी समाजाचे आंदोलन पूर्णपणे थांबले पाहिजे आणि  ओबीसी समाज अंगावर येता कामा नये. त्यांच रक्ताच नातं ओबीसी समाजा सोबत आहे. असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. परंतु, १९६७ पूर्वी कुणबी नोंद असणाऱ्यांना व कायदेशीर दृष्ट्या जो कुणबी सिद्ध झालेला आहे त्यालाच कुणबी जात प्रमाणपत्र मिळेल. परंतु, मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळणार नाही. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील समाजाची फसवणूक करत आहे, असा आरोप मराठा समन्वय आणि आंदोलक संजय लाखे यांनी केला आहे. 





        मनोज जरांगे पाटील स्वतःच महत्त्व वाढवतोय 

   मराठा समाजात वर्षानुवर्षे काम करणारे अनेक सामाजिक घटक असून, मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा सुरू केलेला नसून, हा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे. राजेंद्र जाधे पाटील, किशोर चव्हाण, विनोद पाटील, शिवानंद भानुषे किंवा योगेंद्र केदार यांनी अनेक वर्ष न्यायिक लढा दिला. जगन्नाथाचा रथ मी एकटा ओढत आहे, आणि मी ओढला तरच पुढं जाईल असा जरांगे पाटील यांचा समज झालेला आहे. हा जरांगे पाटीलांचा व्यर्थ अभिमान असून, ते समाजाचा नुकसान करत आहेत. 


   जरांगे पाटील कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत


 मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील नेतृत्व करत नसून, कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. कुणबी समाजाला सोयीस्कर कसं होईल आणि हैद्राबाद गॅजेट नुसार कुणबी समाजाला कसं आरक्षण मिळेल हाच त्यांचा अजेंडा आहे. त्यांची एकही मागणी वैध, कायदेशीर आणि घटनात्मक नाही. जारांगेना कायदा, शासन आदेश आणि पुराव्याचा शासन आदेश यातला जरांगेंना फरकच माहीत नाही. 

     

            जरांगे पाटील बुवाबाजी चालवतात


जोपर्यंत आंदोलन कायद्याच्या चौकटीत बसून सुरू होतं तोपर्यंत शिवानंद भानुशे पाटील, योगेश केदार, किशोर चव्हाण आणि राजेंद्र दाते पाटील किंवा मी एकत्र काम सुरू होतं. आम्ही कायदेशीर दिशा ठरवत होतो. परंतु, नंतर आम्हाला असं समजलं की जरांगे पाटील बुवाबाजी चालवतात. 

   

             विखे पाटलांची मंत्रिमंडळातून तत्काळ                                       हकालपट्टी करा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची मंत्रिमंडळातून तत्काळ राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाची फसवणूक केल्याबद्दल हकालपट्टी करा असे आवाहन संजय लाखे पाटील यांनी केले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या