मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नुकतंच राजकीय यशावर भाष्य केलं आहे. ज्यात त्यांनी राजकीय यश कश्या प्रकारे मिळवलं आहे याचा उलगडा केला आहे.
CM Devendra Fadnavis tells the Truth of Political Success :-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मराठी पत्रकार संघा तर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात त्यांनी राजकीय यशाचा उलगडा केला. राजकीय यश कसं संपादन केलं यावर बोलताना त्यांनी सांगितले की, " अनेकदा लोकांना वाटलं, माझी राख होणार, परंतु, मी त्याचवेळेस भरारी घेतली. " त्यांच्या या विधानावर टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.
![]() |
| Photo Source CM Devendra Fadnavis Twitter Handle. |
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना " मराठी पत्रकार संघा " तर्फे" फिनिक्स विशेष सन्मान " पुरस्कार आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रम मुंबई येथे पार पडला.
पुढे म्हणाले,
माझ्या जीवनात मी कित्येक पदे भूषवली असून, प्रत्येक पदावर गेल्या नंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी टाळत आलो. फार कमी पुरस्कार घेतले असून, त्याचेही प्रमाण नगण्यच आहे. ज्यावेळेस मला वाटेल आपल्या हातून सत्कार्य घडलेलं आहे. त्यावेळेस सत्काराचा स्वीकार केला पाहिजे. ही गोष्ट मी शिकलो आहे.
![]() |
| श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करतानाचा क्षण |
" संयम आणि सकारात्मकता या दोघांच्या सहाय्याने मी राजकारणात टिकू शकलो. जेव्हा जेव्हा राख होण्याची वेळ आली तेव्हा मी त्याला सकारात्मकतेने बघितले. आव्हानांचा ज्या वेळेस माझ्या समोर उभे राहिले त्या वेळेस मी त्यातून पळ काढला नाही. माणसं झुंझवली नाही. टोकाची भूमिका घेतली नाही. कोणाही बद्दल द्वेष बाळगला नाही. विपरीत परिस्थिती मध्ये मी एक एक पाऊल पुढे टाकत गेलो " असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


0 टिप्पण्या