Hot Posts

6/recent/ticker-posts

" भारत पाकिस्तान सामन्या वरून तू तू मैं मैं " "पहलगाम हल्ल्यातील पीडित म्हणतात सामन्यावर बहिष्कार घाला."

 


भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या वरून शासन विरोधक आमने सामने आलेले आहेत. तर, पहलगाम हल्ल्यातील पीडित ऐशन्या द्विवेदी यांनी या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. 




India V/S Pakistan T20 Match २०२५ :- 


भारत पाकिस्तान सामन्या वरून सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. विरोधक या सामन्या वरून चांगलाच आक्रमक पाहायला मिळत आहे. दुबई मध्ये होणाऱ्या  १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान T20 आशिया कप क्रिकेट सामना यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये तू तू मैं मैं सुरू आहे. याला पार्श्वभूमी पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांचा अपमान सरकार करत आहे. असा आरोप विरोधकांचा आहे. 




Photo Source Mumbai Indians 



            शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा या प्रकरणात उडी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका जाहीर केली. " पाकिस्तानने केलेल्या हल्ल्या विरोधात जगभरात केंद्र सरकारने खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले होते. भारताची लढाई दहशतवाद्यां विरोधात आहे आणि देशात पाकिस्तान दहशतवाद्यांना पसरवत आहे. आता यावर केंद्र सरकारची काय भूमिका आहे. सरकारची ही भूमिका देशाशी थट्टा करणारी असून, देशभक्तिशी केलेला व्यापार आहे." असे ते म्हणाले. 

      " माझं कुंकू, माझं देश " शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मोहीम राबवण्यात येणार असून, त्यासाठी महिला चौकात जमतील, आणि सिंदूर गोळा करून पंतप्रधान कार्यालयात पाठवणार आहे . अशी घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. 


     उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या " माझं कुंकू, माझं देश " या अभियानावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, " उद्धव ठाकरेंना माझं देश, माझं कुंकू" अभियान राबवण्या पेक्षा " माझा लादेन , माझा पाकिस्तान अश्या प्रकारचं अभियान राबवावे. उद्धव ठाकरे यांचं प्रेम पाकिस्तान वर असून, पाकिस्तान चा उदो उदो त्यांच्या कडून केला जातो. 

            आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आशिया कप २०२५ भारत V/S पाकिस्तान क्रिकेट सामन्या विरोधात त्यांचे मत मांडले होते. 

       राज्याचे मंत्री निलेश राणे यांनी शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना उद्देशून सामन्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. 

    आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक्स वर पोस्ट करत निषेध नोंदवला. विनय मिश्रा यांच्या एक्स मधील पोस्ट ला रिपोस्ट करत त्यांनी निषेध नोंदवला. 

   

   AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा क्रिकेट च्या होणाऱ्या सामन्या वरून सरकारला जाब विचारला आहे. "पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या २६ नागरिकांची किंमत काय आहे याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. " असे ते म्हणाले. 


      सर्वोच्च न्यायालयात भारत V/S पाकिस्तान  आशिया कप सामना २०२५ च्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु,  हा फक्त सामना आहे. होऊन जाऊ द्या. सामना रविवारी आहे. त्यामुळे काय करता येईल. असे निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळली. 

 

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दिवं. शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी सुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या वर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

 



         केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणावर बोलताना      " Multinational सामना आयसीसी आणि एसीसी व्दारे आयोजित केली जाते. तर, देशाला भाग घेणे बंधनकारक असते. जर  भाग घेतला नाही. तर, सामन्यातून बाहेर होऊन जाऊ. त्या सामन्याला सोडावे लागेल. ज्यामुळे त्याचे पॉइंट्स पाकिस्तानला मिळेल. Multinational खेळात भाग घेतल्या नंतर खेळावंच लागते. द्विपक्षीय (Bilateral) स्पर्धा भारत पाकिस्तान सोबत अनेक वर्षापासून खेळत नाही.  जो पर्यंत  पाकिस्तान भारतावर हल्ले किंवा कारवाई बंद करत नाही. तोवर द्विपक्षीय (Bilateral) स्पर्धा पाकिस्तान सोबत कधीच होणार नाही , असे ते म्हणाले. 


     

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या