Hot Posts

6/recent/ticker-posts

" निरागस मुलाचा दिलदारपणा " " " विडिओ व्हायरल "

 



पंजाब राज्यातील एका निरागस मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पूरग्रस्त भागात गरजेचे साहित्य वाटप करत असताना तो त्यांना नाणे देतो. हे बघून नेटकऱ्यानी त्याचे कौतुक केले आहे. 




Punjab Flood Viral Video :


देशात आणि राज्यात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, दिली आणि हिमाचल प्रदेश मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. पंजाब राज्यात पूरसदृश्य परिस्थिती असताना अनेक माध्यमातून लोकां तर्फे   पूरग्रस्तांना लागणारे साहित्य पुरवल्या जातात. अशातच एका निरागस मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विडिओ पंजाब मधील कुठल्या जिल्ह्यातील आहे याची पुष्टी अजून झालेली नाही.


      





      पंजाब राज्यात पूरग्रस्त भागात पण्याचे आणि गरजेचे साहित्य वितरण करत असताना सिख समुदायातील एक व्यक्ती मुलाला पिण्याच्या पाण्याचे बॉटल देतात. त्याबदल्यात निरागस मुलगा त्यांना नाणे (Coin) देतो. परंतु, ते व्यक्ती पैसे स्वीकारत नाही. त्या मुलाला पैसे परत देतात. पण, तो मुलगा पैसे स्वीकारत नाही. नंतर त्याच्या हाती पैसे (Coin) देतात. तरी तो तिथून जात नाही. तो पैसे घ्या म्हणून खूप रडतो. नंतर त्याचे नातलग त्याला घेऊन जातात. हे बघून तिथले पूरग्रस्तांना मदत करणारे भावुक होऊन जातात. मुलाने दिलेला (coin) नाणे कॅमेऱ्यात दाखवत,  तो क्षण कॅमेऱ्यात टिपतात.  

          व्हायरल व्हिडिओ मध्ये त्याला कदाचित म्हणायचं असेल, " तुम्ही पैसे घ्या, त्याशिवाय मी इथून हलणार नाही". नेटकऱ्यानी या व्हायरल व्हिडिओ वर प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकाने म्हटले " यह पंजाब हैं भाई यहा लोग खीलाते हैं खाते नहीं. पर, नजर लग गयी है अब हमारे गुरुवो के पंजाब मे " , " इसके संस्कार, इसके उमर से बहुत बडे हैं " " नुकसान झाल्याच्या काळातही , त्याने दाना पेक्षा स्वाभिमानाला प्राधान्य दिले. पंजाबचा आत्मा त्याच्या कठीण काळातही सर्वात तेजस्वी पणे चमकतो. चरडी कला " अश्या प्रतिक्रिया नेटकऱ्यानी नोंदवल्या. 

        

     





 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या