इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी ३०० मतं घेत पराभव स्वीकारल्यानंतर, आघाडीत आरोप प्रत्यारोपांची स्थिती पाहायला मिळत आहे.
Indi Alliance :-
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैला प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. त्यामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झालं होतं. निवडणूक आयोगाने ही जागा भरण्यासाठी निवडणूक जाहीर केली. निवडणूक ०९ सप्टेंबर रोजी पार पडली. त्यात एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी 752 वैध मतांपैकी ४५२ मतं मिळवत विजय मिळविला. यामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी 300 मतं घेत पराभव स्वीकारला. इंडी आघाडीच्या काही खासदारांनी एनडीए चे उमेदवारांना मतं दिल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच निमित्ताने इंडिया आघाडीत आरोप प्रत्यारोपांचा सामना पहायला मिळत आहे.
![]() |
| Photo Source The Wire Media Company. |
उपराष्ट्रपती पदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी इंडी आघाडीचे 15 मतं फुटल्याचा दावा केला होता. काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या एक्स पोस्ट ला रिट्विट करत दावा केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, " उपराष्ट्रपती निवडणुकीत काश्मीर ते कन्याकुमारी सर्व खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मग तुम्ही महाराष्ट्राची बदनामी का करत आहात? इंडिया आघाडीचे १४ खासदार फुटले हे भाजप वाल्यांना कसं माहित. याची चौकशी झाली पाहिजे."
तृणमूल काँग्रेस चे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आम आदमी पक्षावर सी.पी.राधाकृष्णन यांना मत दिल्याचा आरोप करत खापर फोडला आहे. तर, काँग्रेस चे खासदार मनीष तिवारी यांनी मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झालेली असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाच्या एकही खासदारांनी सी पी राधाकृष्ण यांना मत दिलेले नाही. आमच्या पक्षाची बाजू एकदम मजबूत आहे असे तेजस्वी यादव म्हणाले.
काँग्रेस चे सर्वेसर्वा राहुल गांधी यांना इंडी आघाडी तील क्रॉस व्होटिंग प्रकरणी विचारले असता. त्यांनी " वोट चोर गद्दी छोड " हा नारा दिला. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी क्रॉस व्होटिंग बाबतचे वृत्त फेटाळले आहेत.
तत्पूर्वी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी निकाल जाहीर होताच आकडा मांडत इंडिया आघाडीला डिवचण्याचे प्रयत्न केले. त्यांनी 15 खासदार कोण आहेत ज्यांनी एनडीए आघाडीच्या बाजूने मत दीले. असा सवाल काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्या ट्विट ला रिपोस्ट करत केला. 10 सप्टेंबर ला केंद्रीय मंत्री किरेन रीजिजू यांनी एक्स वर पोस्ट करत इंडी आघाडीवर निशाणा साधला. इंडी आघाडीच्या काही खासदारांनी एनडीए आघाडीला मतदान केले. त्या सर्वांना विशेष धन्यवाद असा मजकूर लिहीत एक्स वर पोस्ट केले. या पोस्ट नंतर देशात चांगलेच वातावरण तापले आहे.
इंडिया घटक पक्षातील संबंधित खासदारांनी सी . पी. राधाकृष्णन यांना मत दिले. त्यांनी संबंधित खासदारांवर कारवाई करावी अशी मागणी आप पक्षाचे राजसभा खासदार संजय सिंह यांनी केली.


0 टिप्पण्या