" राउज एवेन्यू न्यायालयाने सोनिया गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास दिला नकार " "

 


सोनिया गांधी यांनी भारतीय नागरिकत्व घेण्यापूर्वी ३ वर्षा अगोदर मतदार यादीत नाव नोंदवल्याचा आरोप याचिका कर्त्यांच्या वतीने करण्यात आला. 


Sonia Gandhi Gets Relief :- 

  

  काँग्रेस नेत्या व राज्यसभा खासदार सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याच्या तीन वर्षापूर्वी मतदार यादीत नाव नोंदवले असल्याचा आरोप याचिकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणात राउज एवेन्यू न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वैभव चौरसिया यांनी ही याचिका फेटाळली. तर, याचिका विकास त्रिपाठी यांनी सोनिया गांधींच्या विरोधात दाखल केली. 

          




                           काय आहे प्रकरण ? 

दिल्लीच्या राउज एवेन्यू न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, सोनिया गांधींवर याचिकाकर्त्याने असा आरोप केला की, भारताचे नागरिकत्व मिळण्यापूर्वी त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे मागणी केली. 

     सोनिया गांधींनी ३० एप्रिल १९८३ ला भारतीय नागरिकत्व घेतलं. परंतु , त्यांचे नाव मतदार यादीत १९८० ला मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. असा दावा याचिका कर्त्याने केला. 

         

       कुठल्या आधारावर मतदार यादीत नाव नोंदवले


     भारताचे नागरिकत्व मिळाल्या नंतर १९८० मध्ये मतदार यादीत नाव नोंदवताना कुठल्या कागदपत्रांच्या आधारावर नाव समाविष्ट करण्यात आले ? असा प्रश्न याचिका कर्त्यांच्या वतीने करण्यात आला होता. 

       न्यायालयाने ही याचिका फेटाळत सोनिया गांधींना मोठा दिलासा दिला. न्यायालयाने ही याचिका मजबूत पुरावा नसल्या कारणाने फेटाळली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या