Hot Posts

6/recent/ticker-posts

" मी तुमच्या अधिकृत फोटोग्राफर तर्फे फोटो ... " खासदार महुआ मोईत्रा यांनी निवडणूक आयोगाला डिवचले "

 

लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनी निवडणूक आयोगाला उपराष्ट्रपती पदाची निवडणुक मतदान केल्यानंतर एक्स वर पोस्ट करत डिवचले.



MP Mahua Moitra Criticises ECI :- 


काही दिवसांपूर्वीच उपराष्ट्रपती पदाची निवडणुक ०९ सप्टेंबर रोजी पार पडली. याच दिवशी निकालही जाहीर करण्यात आला. सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी (३ पक्ष वगळता) लोकशाही च्या प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावला. हक्क बजावत असताना प्रधानमंत्री सह अनेक खासदारांचे फोटो काढण्यात आले. अशातच पश्चिम बंगाल राज्यातील कृष्णानगर मतदारसंघाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीतील मतदान करताना काढलेल्या फोटोचा ववापर करत निवडणूक आयोगाला डिवचले आहे.












केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी निवडणूक आयोगाला डिवचले. ते म्हणाले " मी एक महिला आहे आणि तुमच्या अधिकृत फोटोग्राफर समोर मतदान करत असताना फोटो काढत आहे." 

       काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत,  "आई, बहीण, आणि भगिनी यांचे मतदान करताना चे सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर करायला पाहिजे का?" असा सवाल विरोधकांना विचारला. 

          त्यावर महुआ मोईत्रा ने एक्स वर पोस्ट लिहीत केंद्रीय निवडणूक आयोगाला डिवचले.




       राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत तत्पूर्वी निवडणूक आयोगाला उद्देशून बोलताना म्हणाले , " निवडणूक आयोग जर सीसीटीव्ही व्हिडिओ देत नसेल तर ते गुन्हेगार ठरतात." 


         



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या