Hot Posts

6/recent/ticker-posts

"पी.यू.सी. नसेल तर पेट्रोल डीझेल मिळणार नाही" " परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा "

 

राज्य शासना तर्फे " PUC नाही, तर इंधन नाही " योजना लवकरच सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 



PUC Certificate Compulsory :-


दैनंदिन कामासाठी आपण खाजगी वाहनांचा वापर करत असतो. खाजगी वाहन चालवत असताना गाडी मध्ये पेट्रोल डीझेल असणे आवश्यक आहे. आतापर्यंत  PUC शिवाय इंधन दिले जात होते. परंतु, आता तसे होणार नाही. शासनाने एक योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. " पी.यू .सी. नाही, तर इंधन नाही " असं या योजनेचं नाव आहे. म्हणजेच तुमच्याकडे जर पी.यू.सी. नसेल, तर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. 

    



Photo Source From Transport Minister Pratap Sarnaik.



             पी.यू.सी. वैध असणे बंधनकारक


सध्याचे वाढते तापमान आणि बदलते हवामान भविष्यासाठी धोक्याची घंटा असून, भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी प्रदूषण मुक्त पर्यावरण निर्माण करण्यासाठी स्वतःला काही पर्यावरण पूरक निर्बंध घालणे महत्त्वाचे आहेत. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) वैध असणे गरजेचे आहे. 


        सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे स्कॅन होणार


राज्यातील सर्वच पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गाडी नंबर स्कॅन करून, तपासला जाणार आहे. त्यावरूनच PUC वैध आहे की नाही याची पुष्टी होणार आहे. जर त्या वाहनांचे PUC नसेल किंवा दिलेल्या PUC ची मुदत संपली असेल. तर, त्या गाडीला इंधन दिले जाणार नाही. पेट्रोल पंपवर च PUC काढून देण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. 








    भविष्यात गॅरेज आणि वाहन शो रूम मध्ये सुद्धा PUC प्रमाणपत्र काढून देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून, सर्व वाहन वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले राहतील आणि त्यामुळे प्रदूषण स्तर कमी करण्यास मदत होईल. 

        या PUC प्रमाणपत्र मध्ये UID नंबरचा समावेश असणार आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. परिवहन आयुक्त कार्यालय मध्ये निर्णय घेण्या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह सचिव  राजेंद्र होळकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या