Hot Posts

6/recent/ticker-posts

" क्रिकेट देशापेक्षा मोठे नाही म्हणत, सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका "

 



दुबई मध्ये १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान T20 आशिया कप क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 


News Source Live Law :- 


India-Pakistan Cricket Match                            Tournament T20 Asia Cup  :-  


दुबई येथे १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान T20 आशिया कप क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा या मागणीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. क्रिकेट देशापेक्षा मोठे नाही म्हणत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. उर्वशी जैन यांच्या नेतृत्वात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 

 



    " ऑपरेशन सींदूर आणि पहलगाम आतंकवादी हल्ला ज्यामध्ये भारतीय सैन्याला विर मारण आले. पाकिस्तान सोबत सामना झाला तर उलट संदेश जाण्याची शक्यता अधिक असून,  सैनिक आपले प्राण देशासाठी अर्पण करत असताना आणि पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत असताना, आपण त्याच देशा सोबत सामना खेळत आहोत. यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्याच्या हातून प्राण गमावलेल्या बळींच्या कुटुंबियांच्या भावना दुखावू शकतात. राष्ट्राची प्रतिष्ठा आणि नागरिकांची सुरक्षा या दृष्टिकोनातून हा सामना रद्द करावा " असे याचिकेत म्हटले आहे.

         हा सामना सुरू ठेवणे राष्ट्राच्या सुरक्षा आणि अखंडते साठी हानिकारक असून, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ ( National Sports Governance Act, 2025) च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याचीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

      भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ला या याचिकेत पक्षकार म्हणून सहभागी करून घेण्यात आले असून, बीसीसीआयला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्याची वेळ आली आहे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. 

        

    ॲड. स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मु. अनस चौधरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या