Hot Posts

6/recent/ticker-posts

एनडीए चे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांचा विजय " " इंडी आघाडीचे खासदार फुटले "

 



उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला आहे. 



Vice President Of India Election 2025 :- 

     

काल दिनांक ०९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणुक पार पडली. यामध्ये एनडीए आघाडी कडून सी पि राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली. तर, इंडी आघाडी कडून बी सुदर्शन रेड्डी यांनी निवडणूक लढवली. काल रात्रीच निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. सी पि राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आले. 





           एनडीए आघाडीचे उमेदवार राधाकृष्णन यांनी 452 मतं घेत दणदणीत विजय मिळवला. तर, इंडी आघाडीचे उमेदवार माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी 300 मतं घेत पराभव स्वीकारला. राज्यसभा सरचिटणीस व Returning अधिकारी पि सी मोदी यांनी हा निकाल जाहीर केला. 

           

    एबीपी माझाच्या वृत्तानुसार, एनडीए आणि इंडी आघाडी मध्ये झालेल्या लढतीत इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी सी. पी. राधाकृष्णन यांना मत दीले असल्याचे निकालानंतर सिद्ध झालं आहे. सी. पी. राधाकृष्णन यांना 752 वैध मतांपैकी ४५२ पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर, १५ मतं या निवडणुकीच्या प्रक्रियेत बाद झाले आहे. त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या वृत्तास भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दुजोरा दिलेला आहे. 




      काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लिहिलेल्या पोस्ट ला रिट्विट करताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 15 खासदार कौन होते ज्यांनी एनडीए आघाडीला मतदान केलं, असा सवाल काँग्रेस ला विचारला. 

    


 सध्या लोकसभेत 543 सदस्य आहेत. तर, राज्यसभेत २४५ खासदार आहेत. लोकसभेत १ जागा रिक्त आहे तर राज्यसभेत एकूण ०५ जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी ३९१ मतांची आवश्यकता होती. BRS चे राज्यसभा चार खासदार, बिजू जनता दलाचे ७ राज्यसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दलाचे १ लोकसभा आणि ०२ राज्यसभा खासदार आहेत. या तिन्ही पक्षांनी या निवडणुकीत भाग न घेता तटस्थ भूमिका घेतली. 


     पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांनी एक्स वर उप राष्ट्रपती पदी निवडून आल्या बद्दल सी.पी.राधाकृष्णन यांचे हार्दिक अभिनंदन केले. 

        






देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या राष्ट्रपती भवन कार्यालयाने एक्स वर अभिनंदन पर पोस्ट लिहीत सी पि राधाकृष्णन यांना सदिच्छा दिल्या. 








     देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला गरजेचे आहे. या अनुषंगाने ही निवडणूक घेण्यात आली. 

                


          


          

             


        

     

        





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या