Hot Posts

6/recent/ticker-posts

" अमित शहांचा "नरेंद्र मोदी राजीनामा द्या" म्हणणारा व्हायरल व्हिडिओ बनावट "

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नरेंद्र मोदींना राजीनामा द्यायला लावणारा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा PIB Fact Check ने केला आहे. 


Amit Shah Demands Resign Narendra Modi Viral Video :- 


तंत्रज्ञान जसं जसं विकसित होत आहे. तसं तसं माणूस त्याचा वापर करायला लागला आहे. सध्या आता AI जगभरात धुमाकूळ घालत आहे. त्याचा वापर करणे फार गरजेचे आहे. परंतु, त्याचा दुरुपयोग सध्या वाढत चालला आहे. ज्याचा वास्तविकता सोबत काही संबंध नसतो. असे व्हिडिओ समाज माध्यमा वर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा व्हायरल झाला आहे. PIB (Press Information Bureau) ने व्हायरल व्हिडिओ ची पडताळणी करत सत्य समोर आणले आहे. 






         व्हायरल व्हिडिओ मध्ये पत्रकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल विचारतो. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणतात, " अजित डोवल यांनी "ऑपरेशन सिंदूर" मध्ये दिलेल्या योजनेत आमच्या कडून फार मोठी चूक झाली. पाकिस्तानला आम्ही छोटे समजलो ही आमची मोठी चूक झाली. सोफिया कुरेशी यांची पत्रकार परिषद ऐकली तेव्हा वास्तविकता समोर आली. पाकिस्तान ने 26 पेक्षा जास्त मिसाईल देशावर टाकले. तेव्हा कुठे गेला मोदींचा विकास? मोदीजी आता राजीनामा द्या आणि घरी जा." 

          केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा CNN-News18 वरील मुलाखतीचा काही भाग AI व्दारे एडिटिंग करून समाज माध्यमांवर शेअर केलं. १७ सप्टेंबर ला नरेंद्र मोदींचा वाढदिवस होता. त्याप्रसंगी त्यांच्या जवळचे लोकं त्यांचे किस्से ऐकवित होते. तर, मुलाखती मध्ये अमित शहा यांनी सुद्धा किस्सा एकवायला सुरुवात केली. परंतु, नेमका तोच व्हिडिओ AI व्दारे एडिट करून समाज माध्यमांवर शेअर केला. 


         खऱ्या व्हिडिओ मध्ये पत्रकारांना उत्तर देताना अमित शहा म्हणतात की, " संघाच्या बैठकीत आम्ही दोघे भेटलो होतो. १०-१५ युवक स्वयं-सेवकां सोबत का जायला पाहिजे आणि संघाच्या उद्देशा बद्दल सांगत असत."

         

             

      


     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या