Hot Posts

6/recent/ticker-posts

" त्रिषा ठोसर चा पुरस्कार स्वीकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल " " नेटकरी म्हणाले अभिनंदन त्रिशा.... "

 


बाल कलाकार त्रिशा ठोसर हीचा ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्विकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेतकऱ्यानी तिचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.




Child Artist Trisha Thosar Viral Video :- 

 दरवर्षी प्रमाणे दिला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यंदाही प्रदान करण्यात आला. यंदाचा हा ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असून, विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक कलाकारांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. तर, बाल कलाकार म्हणून नाळ भाग २ चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या बद्दल त्रिशा ठोसर हीचा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 






          व्हायरल व्हिडिओ मध्ये त्रीशा ठोसर हीचे नावाची घोषणा होताच, ती उपस्थित कलाकार आणि जनसमुदाय कडे बघून नमस्कार करते आणि नंतर थोडं पुढे गेल्या नंतर राष्ट्रपतींना नमस्कार करते तेव्हा अभिनेते किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी उभे राहून टाळ्या वाजवतात. त्याच वेळेला उपस्थित जनसमुदाय तिच्या समर्थनार्थ ओरडायला लागतात. नंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु तिला पुरस्कार देत तिचा सन्मान करतात. याप्रसंगी भारत सरकारमध्ये रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून कार्यरत असलेले अश्विनी वैष्णव सुद्धा हसतमुखाने तिच्या कडे बघत तिचे कौतुक करताना दिसतात.  


Photo Source Anwar Ali Twitter Account 





     या व्हिडिओ मध्ये विशेष असे की ती साडी घालून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर येते. पुरस्कार स्विकारताना तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास स्पष्ट दिसतो. 

     

                      काय म्हणाले नेटकरी? 


abhijat_maharashtra या इंस्टाग्राम अकाउंट वर नेटकऱ्यानी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले " wow अभिनंदन...मला त्रिषाचा पोशाख खूप आवडला. खूप अभिमान आहे बाळाचा ",       " मराठी कलाकार करिता अभिमानाचा दिवस ", "Congratulations Trisha, Dress code is perfect & So Cute ", " साडी पहनकर भी कीतनी अच्छी तरह चलकर आयी बच्ची " अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यानी दिल्या. 


         पुरस्कार प्राप्त झाल्या नंतर  ANI वृत्त एजन्सी ने त्रिशा ठोसर ची मुलाखत घेतली. तेव्हा, तिला पत्रकार महिलेने विचारले, पुरस्कार प्राप्त झाल्या नंतर तुला कसं वाटतंय? तेव्हा ती म्हणते मला खूप छान वाटत आहे. 

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या