आमदार जयंत पाटील यांनी पुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यासह ज्यांच्या जनावरांचे नुकसान झाले आहे त्यांना सुद्धा आर्थिक मदत करण्याची मागणी केली.
Jayant Patil Demands Package For Farmers :-
खैराव गावात आम्ही सकाळपासून दौरा करत असून, सध्याचे चित्र मोठे भयानक आहे. द्राक्षाच्या बागा पूर्णपणे जळालेले असून, पलीकडच्या भागात रेल्वे लाईन मध्ये असेच चित्र आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केल्या नंतर आम्हाला असं कळालं की, आर्थिक नुकसान भरपाई प्रंड मोठ्या प्रमाणात झालेली असून, सरकारने ताबडतोब एकरी ५०,००० रुपयांची मदत सरसकट जाहीर करावी आणि पंचनामाच्या भानगडीत पडू नये असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
![]() |
| Photo Source The Asian Age Media Company. |
६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला
राज्यात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे गावे पाण्याखाली गेली असून, पंचनामे करण्याची गरज नाही. सरकारने ३०,००० रुपयांची मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. जिथे जमिनी खरडून गेल्या असतील तिथे ३०,००० रुपये प्रति एकर सरकारने द्यावेत व डाळिंब आणि इतर पिकं या पिकांना देखील मोठी नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था सरकारने करावी.
शेतकरी आधीच हवालदिल
आधीच शेतकऱ्याने घेतलेले कर्ज आणि वेळेवर उद्भवणारी आपत्ती त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. पाऊस पडतोय आणि नदी पात्रातील पाणी बाहेर येणार आहे या साठी चेतावणी आधी लोकांना देण्याची व्यवस्था कुठेच दिसत नाही. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला ताबडतोब सरकारने मदत करावी असे आवाहन केले.
जनावरांच मोठं नुकसान झालं
गावंच्या गाव पाण्याखाली गेले असून, जनावरांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. जनावर पुराच्या पाण्यात वाहून गेलं असेल. तर, अश्या शेतकऱ्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने सरकारने केला पाहिजे. त्या शेतकऱ्यांना ताबडतोब तेवढीच मोठी नुकसान भरपाई दिली पाहिजे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी
शेतकऱ्यांना आता आपलं कुणी नाही अशी भावना तयार व्हायला लागली असून, कर्जमाफी आम्ही योग्य वेळी करू असं सरकार म्हणते. परंतु, याच्या पेक्षा कुठलीच योग्य वेळ अशीच शकत नाही. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज माफी दिली पाहिजे. आणि त्यांना नवं कर्ज देण्याचं काम करावं. शेतकऱ्याला उभं करायला दुसरा कुठला मार्ग नाही.
लोकप्रतिनिधींनी सहानुभूतीच्या भावनेने काम करावे
शेतकऱ्याला आता आयुष्य नको झालेलं असून, तो खूप त्रासलेलं आहे, त्याने एखादं अपशब्द वापरल्यास त्याला समजून घेण्याचे काम लोकप्रतिनिधींनी सहानुभूतीपूर्वक केले पाहिजे. त्याच्या भावना समजून घेऊन त्याला मदत करण्यासाठी आपण आलो आहोत. ही भावना मनात ठेवून त्याला उलट उत्तर देणे योग्य नाही.

0 टिप्पण्या