BSP Supremo Bahan Mayawati :-
कानपूर :-
उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यात प्रसिद्ध भगवान गौतम बुद्धा पार्क चे रूपांतर शिवालय पार्क मध्ये करण्याचा प्रस्ताव कानपूर नगर निगम ने राज्य सरकार समोर ठेवला होता. त्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संमती दिली. तब्बल १५ कोटी रुपये भगवान गौतम बुद्ध पार्क चे रूपांतर शिवालय पार्क मध्ये करण्यासाठी सरकारने मंजूर केले. त्यानंतर भगवान गौतम बुद्धा पार्क वर बौध्द समुदायातील लोकांनी निदर्शने केली. आझाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा चंद्रशेखर आझाद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहत विरोध दर्शवला होता. हा निर्णय योगी सरकारने मागे घेतला असून, बहन मायावती यांनी त्यांचे आभार मानले आहे. विरोध म्हणून बहुजन समाज पार्टी प्रमुख बहन मायावती यांनी एक्स वर ३१ ऑगस्ट रोजी पोस्ट करत उत्तर प्रदेश शासनाचा निषेध व्यक्त केला होता.
बसपा प्रमुख म्हणाल्या ,
" भारत देश धर्मनिरपेक्ष असून, सर्व समुदायाचे लोकं या देशात राहतात आणि त्या सर्वांचे धार्मिक स्थळ वेगवेगळे आहेत. तसंच कानपूर मधील भगवान गौतम बुद्ध पार्क हे आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध धर्मियांसाठी हे आस्थेच प्रतीक आहे. परंतु, बुद्धा पार्क आता दुसऱ्या धार्मिक स्थळां मध्ये रुपांतरीत करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव शासनाने तातडीने थांबवावा. अन्यथा लोकांमध्ये अशांती चे वातावरण निर्माण होईल. "
0 टिप्पण्या