उमर खालिद, शार्जील इमाम यांच्यासह अजून सात जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
उमर खालिद प्रकरण :-
दिल्ली येथे २०२० साली घडलेल्या दंगली प्रकरणी कट रचल्याच्या आरोपा खाली दिल्ली उच्च न्यायालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) कायद्या अंतर्गत अटकेत असलेल्या उमर खालिद, शार्जील इमाम, अतहर खान, खालिद सैफी, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान, मीरान हैदर, गुल्फिषा फातिमा आणि शदब अहमद यांचा जामीन नाकारला. न्यायाधीश सुब्रमणियन प्रसाद आणि न्यायाधीश नवीन चावला आणि शालिंडर कौर यांच्या न्याय विभागीय खंडपीठाने हा निर्णय दिला. याच प्रकरणातील आरोपी तस्लिम अहमद यांनी हा अर्ज केला होता. न्यायालयाचा हा निर्णय त्यांच्यासाठी फार मोठा झटका मानला जात आहे.
वेगवेगळ्या खंडपीठांसमोर खालिद सैफी, गुल्फिषा फातिमा, मोहम्मद सलीम खान, शिफा उर रहमान यांनी दोनदा जामीन मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अपील केला. परंतु, न्यायालयाने ते फेटाळले.
या प्रकरणातील आरोपी २०२० पासून अटकेत असून, त्यांना आता पर्यंत जामीन मिळालेला नाही. खालच्या न्यायालयात त्यांनी तत्पूर्वी जामीन साठी अर्ज केला होता. उमर खालिद यांना २०२० साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा हा उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी दुसरा प्रयत्न आहे.
खालच्या कोर्टात त्यांनी २०२२ साली जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, तेव्हाही त्यांना जामीन देण्यात आला नव्हता.
शर्जील इमाम यांचे वकील अहमद इब्राहिम दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावर व्यक्त होताना म्हणतात, " शर्जिल आणि खालिद यांच्या जामिनीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला, दुर्दैव असून, आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. "
0 टिप्पण्या