अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत कर्ज व्याज परतावा योजना मराठा युवक अथवा युवतींसाठी राबवण्यात येते.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :-
जर तुम्ही गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांतील म्हणजेच मराठा समाजातून येत असाल आणि तुम्हाला इतरांकडे नोकरी न मागता स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासना तर्फे मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील तरुण किंवा तरूणीं करिता व्यवसाय करून आर्थिक दृष्टीने सक्षम बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. महामंडळाची स्थापना २७ नोव्हेंबर १९९८ रोजी करण्यात आली होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे देण्यात येणाऱ्या " वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना " असे त्या योजनेचे नाव आहे.
अण्णासाहेब पाटील महामंडळाची उद्दिष्टे
महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील तरुण तरुणींना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी लागणाऱ्या भांडवल या योजने अंतर्गत पुरवली जाते. मराठा समाजातील वाढत चाललेल्या बेरोजगारीला कमी करणे आणि उद्योजकतेला चालना देणे हे या महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
काय आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ?
या कर्जाला IR-I असे सुद्धा म्हणतात. या योजने अंतर्गत राज्यातील कुठल्याही बँके मार्फत कुठलाही व्यवसाय करण्यासाठी १५ लाख रुपयां पर्यंत उद्योगा करिता कर्ज घेतल्यास व्याज परतावा ७ वर्षां करिता १२ टक्के दराने देण्यात येतो. २ फेब्रुवारी २०१८ ते २९ ऑगस्ट या कालावधीत १,५३,७२६ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेसाठी आता पर्यंत तब्बल मंजूर रक्कम १३,१६९.९९ कोटी रुपये या योजने अंतर्गत वितरित करण्यात आले.
कसा कराल अर्ज?
तुम्हाला पाटील महामंडळ मधील योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकता. या नंतर हेतू पत्र(LOI) मिळते. LOI घेणे आवश्यक आहे. ते बँकेत कर्ज मंजुरी साठी सादर करावे लागते. लभार्थीचे खाते ज्या बँकेत आहेत त्या बँकेत त्याला LOI समवेत त्याला करायचा असलेल्या व्यवसाया संबंधित कागदपत्रे बँक मध्ये दाखल करावा लागेल. बँकेने कर्जाला मंजुरी दिल्या नंतर कर्जमंजुरी बाबतची सर्व माहिती वेब प्रणालीवर भरावी. यानंतर बँकेमध्ये पूर्ण ई एम आय भरल्या नंतरच ऑनलाइन क्लेम करावा. ई एम आय ठरलेल्या काल मर्यादेपर्यंत भरलेला असल्यास त्याला व्याज परतावा मिळेल.
नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे
1.रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशन कार्ड, लाईटबिल, बँक बुक, गॅस बिल यापैकी कुठलाही एक रहिवासी पुरावा जोडावे लागेल.
2. लग्न झाले असल्यास आयकर रिटर्न, नवरा-बायकोचे व लग्न न झालेल्या सदस्यांचे स्वतःचे आयकर रिटर्न आवश्यक या दोन पैकी एक उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करावा लागेल.
3.शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला जोडावा लागेल
4.लग्न झालेल्या महिलांना Pan Card किंवा Marriage Certificate जोडावे लागेल.
5.स्वतः घोषणापत्र अपलोड करावी लागेल.
6.आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वतःची ईमेल आयडी नोंदणी करण्यासाठी आवश्यकता आहे.
योजनांचे अटी आणि शर्ती
1.नोंदणी अर्ज करण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
2.अर्जदाराचे वय १८ ते ६० पर्यंत असणे गरजेचे आहे.
3.लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख पर्यंत पाहिजे.
4.इच्छुक उमेदवार जर दिव्यांग असेल आणि त्याला या योजने नुसार लाभ घ्यायचा असेल. तर, तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. आणि त्याच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
अधिकची माहिती हवी असल्यास https://udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
0 टिप्पण्या