सुप्रिया सुळे यांनी आज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद थांबला. आंदोलन स्थळावरून निघताच आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली.
Supriya Sule visits Jarange Patil :-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नेत्या तसेच लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मुंबईच्या आझाद मैदान मध्ये आमरण उपोषण सुरू आहे. त्यांचा आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. याप्रसंगी त्यांनी जरांगेंच्या प्रकृती बद्दल विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
त्याप्रसंगी त्यांनी माध्यमांना सांगितले की, " जरांगे पाटील यांनी तीन दिवसापासून काहीच न खाल्ल्याने भयंकर कमजोरी आलेली आहे. ४ दिवसां पासून काहीच न खाल्ल्याने त्यांना थकल्या सारखे जाणवत आहे. मी त्यांना उठून बसण्यासाठी मनाई केली असून, तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा जरांगेंना केले."
एक दिवसाचे तातडीने अधिवेशन बोलवा
" मनोज जारांगे पाटील यांचा निरोप पोहचवण्याची नैतिक जबाबदारी आमची असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. बैठकीतून समाधान झालं नाही. तर, एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. जर कुठल्याच पक्षाचा मराठा आरक्षण संदर्भात विरोध नसेल तर तातडीने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा. त्याच्यातून प्रश्न सुटला नाही तर घटना दुरुस्ती साठी अधिवेशन बोलवावं."
स्वच्छतेचा प्रश्न सोडवा
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा आटोपून त्यांनी माध्यमांना जरांगे पाटील यांच्या मागण्यां बद्दल सविस्तर सांगितले. आंदोलनाच्या ठिकाणी स्वच्छतेचा (शौचालय) मोठा प्रश्न असून, अन्नाचा प्रश्न सुटलेला आहे. याठिकाणी चार लाइट्स असणे फार महत्त्वाचे आहेत. आंदोलन कर्त्यांची गैरसोय होऊ नये अशी विनंती महाराष्ट्र शासनाला आणि मुंबई महानगर पालिकेला करावी अशी जरांगेंची मागणी आहे. असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
आंदोलकांनी दिल्या जोरदार घोषणा
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा आटोपून निघत असताना मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यांनी सुळेंची गाडी अडवून शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. शरद पवार यांनी समाजाचे वाटोळं केल्याच्या घोषणा त्यांनी सुळेंसमोर दिल्या. त्यानंतर काही वेळातच गाडी तिथून थोडं पुढे निघून गेल्या नंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर बॉटल फेकून मारल्या. तत्पूर्वी त्यांनी आंदोलकांशी हसतमुखाने हात मिळवला.
शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. याचा राग म्हणून त्यांनी सुप्रिया सुळें समोर शरद पवारांच्या विरोधात घोषणा दिल्या.
0 टिप्पण्या