गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडल्याने काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका शेतकऱ्याच्या शेतात पुराचे पाणी साचल्याने आणि पीक वाहून गेल्याने टाहो फोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Farmer Viral Video :-
देशातील आणि राज्यातील काही भागात सतत पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्यातील नद्यांना पूर आल्याने ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहेत. लातूर जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण झालेली असून, जल्ह्यातील अनेक भागात पावसामुळे नदीलगत च्या शेत आवारात पाणी पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. काहींचे पिकं आडवी झाली आहेत. तर, काहींच्या शेतात पाणी घुसून पिकं वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे. अशातच एका शेतकऱ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
व्हायरल विडिओ मधील घटना लातूर जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. शेतातील पिकं आडवी झाली आणि काही पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्याने आत्महत्येचा हट्ट धरलेला आहे. मी आता काय करू, मरु दे मला आता जगायचं नाही ? जे होतं ते बी गेलं? सरकार काय करनार ? असा आक्रोश शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. शेतकरी च्या बाजूला एक तरुण आहे तो त्या म्हाताऱ्या शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर अजून एक तरुण असे दोन तरुण त्या शेतकऱ्याला पाण्याच्या बाहेर नेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न करतात.
व्हायरल व्हिडिओ मध्ये शेतकरी आक्रमक झालेला असून, आत्महत्या करण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या समोर सर्व हतबल असतात. त्यांचा आक्रोश सरकारने लक्षात घेऊन शेतकऱ्यांची आवश्यक ती मदत सरकारने केली पाहिजे.
0 टिप्पण्या