छोटा हत्ती माणसांना स्वच्छतेचा संदेश देतो आहे असे, व्हिडिओ मध्ये दिसत आहे. याआधी असाच ताडोबा जंगलातील वाघिणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Elephant Child Putting Garbage in DustBin :-
समाज माध्यमांवर व्हिडिओ अनेक प्रकारचे व्हायरल होत असतात. प्राणी माणसांना खूप काही शिकवण देऊन जातात. परंतु, मनुष्य त्यातून शिकवण घेताना दिसत नाही. मागे ताडोबा मधील वाघिणीचा पाण्यातून बॉटल काढण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती वाघीण पाण्यातून बॉटल काढते आणि तोंडात धरून बॉटल घेऊन जाते. त्याचवेळी एकाने व्हिडिओ शूट केला होता. वाघिणीच्या व्हायरल व्हिडिओ ने समाज माध्यमां वर जगात धुमाकूळ घातला होता. आताही असाच एका छोट्या हत्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विडिओ कुठला आहे याची अजून खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.
व्हायरल व्हिडिओ मध्ये दोन हत्ती रस्त्याने जाताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ मध्ये एक हत्ती आणि तिचे एक पिल्लू दिसत आहे. हत्ती वाटेत जात असताना, हत्तीच्या पिल्लु ला आकाराचा एक वस्तू दिसते. ती वस्तू तो सोंडेने उचलतो आणि कचऱ्याच्या डब्ब्यात टाकतो. तेव्हाच समोरून काही लोकं येताना व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओ वर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यानी लिहिले, "AI Video धोकेबाज AI ", " AI का कमाल हैं, कुछ हो सकता है ", " जंगल सब खत्तम काट कर दिया इनका ", " सिखो कुछ जानवर से ", " हाथी को दिमाग हैं लेकीन इंसान को नहीं ", " आदमी से ज्यादा बेजुबान जानवर ही ठीक हैं" अश्या प्रकारे कॉमेंट्स लिहिल्या.
विडिओ news_svs ने इंस्टाग्राम वर पोस्ट केलाय.

0 टिप्पण्या