Hot Posts

6/recent/ticker-posts

" जो पक्ष मुस्लिमांना उमेदवारी देत नाही ते मुस्लिम ऑफिसर बनवेल ? असदुद्दीन ओवेसिंचा टोला "

 


सर्वोच्च न्यायालयाने आज १५ सप्टेंबर रोजी वक्फ कायदा (सुधारणा) २०२५ यात काही तरतुदीं मध्ये स्थगिती दिली. त्यावर AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी भाष्य केलं. 



Asaduddin Owaisi On SC Stay  Waqf Act  :-


सरकारने २०२४ ला लोकसभा आणि राज्यसभा मध्ये पास केलेल्या वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ ला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने वक्फ संदर्भात निर्णय देताना दोन तरतुदींवर स्थगिती दिली. परंतु्, संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला. यावर प्रतिक्रिया देताना AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला उद्देशून म्हणाले, " सुप्रीम कोर्टाने म्हटल्या नुसार जसं जमेल तसं मुस्लिम समाजातील सीईओ पदी नियुक्ती करा. परंतु, आम्हाला मुस्लिम समाजातील कोणी मिळालंच नाही असं सरकार म्हणू शकतं. असा टोला त्यांनी लगावला. जो पक्ष मुस्लिम समाजाला उमेदवारी देत नाही. ज्या पक्षाचा मुस्लिम खासदार नाही तो पक्ष मुस्लिम सीईओ बनवणार का ? असा टोला ओवेसींनी भाजप वर लगावला. 



Photo Source India TV News



        सर्वोच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला असून, सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर या कायद्या वरील सुनावणी पूर्ण करून अंतिम निर्णय दिला पाहिजे. मोदी सरकारने आणलेल्या या कायद्यामुळे वक्फ जमीन सुरक्षित राहणार नसून, अतिक्रमण करणाऱ्यांना ती जमीन मोबदला म्हणून दिली जाणार, अशी शंका असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली. 

   

  वक्फ च्या नोंदणी ला स्थगिती नाही. परंतु, कागदपत्र कुठून आणायचे हा प्रश्न त्यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला. गैर-मुस्लिमांना तुम्ही वक्फ चे सदस्य बनवत आहात. परंतु, कलम २६ च उल्लंघन आहे, असे ओवेसी म्हणाले. 



       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या