सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी SIT Sthapan करण्याचा उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्वाळा
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी शासनाने नेमलेल्या समितीला मान्यता देण्यात आलेली नसून, त्यांच्याकडील सर्व कागदपत्र विशेष तपास पथक स्थापन केल्या नंतर त्यांना सुपूर्द करा असे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकांना एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोर्टात आज याचिकाकर्त्या विजयाबाई सूर्यवंशी यांची तारीख होती. त्याप्रसंगी त्यांचे वकील म्हणून हजर होते.
पुढे म्हणाले, "याचिकाकर्त्यांना संधी देण्यात आली असून, चौकशीच्या दरम्यान त्यांना काही शंका असेल तर ते सत्र न्यायालयात किवा दंडाधिकारी यांच्या कडे अर्ज करू शकतात. सरकारने केलेल्या कामावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. उरलेल्या मागण्यां बाबत उत्तरात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले असून, 3 आठवड्यात शपथपत्र दाखल करण्यास सांगितले. 9 ऑगस्ट रोजी प्रकरण बोर्डवर ठेवण्यात आलेलं आहे."
सोमनाथ सूर्यवंशी ताब्यात असताना त्याचा खून करण्यात आला. किती पोलीसांचा सोमनाथ ला मारण्यात समावेश होता. याचा उलगडा सहआरोपी विधान देण्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही. तोपर्यंत तिथे आरोपी कोण हे निश्चित करता येत नाही, असेही ते म्हणाले.
साक्षीदारांना फोडण्याचा काम आता मोठ्या प्रमाणात होणार असून, साक्षीदार जर फुटले नाहीत, तर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा असून, पोलीस खात्यात काही व्यक्ती ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत. असल्या प्रवृत्तींच्या लोकांना वाचवण्यासाठी शासनाने स्वतःला पणाला लावू नये, सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आरोपींना वाचविण्यासाठी पणाला लावले होते. माणसाचा जीव महत्त्वाचा असून, त्यासाठी द्यावा. पोलिसांना वाचण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी शासनाला दिला.
याचिकाकर्त्या विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या
माझा शंभर टक्के कोर्टावर विश्वास आहे. मला न्यायालयच न्याय देईल आणि संपूर्ण काम उत्तम रित्या न्यायालय पार पाडेल. माझ्या मुलाला न्याय मिळवून देईल असा मला विश्वास आहे. पोलीसांनी आणि शासनाने संविधानाच्या मार्गावर चालावे. देशातील संविधान श्रेष्ठ असून, न्यायालय संविधानाच्या मार्गावर चालतंय. तर, सगळ्यांनीच संविधानाच्या मार्गावर चालावं.

0 टिप्पण्या