HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी सरकारने अजून मुदतवाढ केल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई:-
एचएसआरपी नंबर प्लेट जर तुम्ही बसवली नसेल तर लगेच बसवून घ्या. सरकारने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी ज्यांनी गाडी विकत घेतली होती त्यांच्यासाठी एचएसआरपी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केलं होतं. ज्यासाठी सरकार कडून 15 ऑगस्ट ही तारीख शेवटची जाहीर करण्यात आली होती. अनेक लोकांनी काही कारणास्तव एचआरएसपी नंबर प्लेट बसवली नव्हती. त्यामुळे आता तारखेत वाढ करण्यात आली असून, ३० नोव्हेंबर पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाने अनेक वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
लोकसत्ता वृत्त्तानुसार, केवळ 30 टक्के लोकांनी HSRP नंबर प्लेट साठी अर्ज केला आहे, त्यातील २० टक्केच वाहनांना पाटी लावण्यात आले असून, उरलेले 10 टक्के वाहनधारकांना नंबर प्लेट लावण्यासाठी सेंटरने वेळ दिलेला आहे.
कुठे करायची नोंदणी?
वाहनधारकांना प्रथम सरकारच्या वेबसाईट वर जाऊन http://transport.maharashtra.gov.in नोंदणी करणे आवश्यक आहे. Fitment center ची निवड करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर त्यांना शुल्क भरावे लागणार आहे.
काय कारण मुदतवाढ देण्याचे ?
शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या वाहन मालकांना पुढील महिन्यात नंबर प्लेट बसवण्या साठी तारीख मिळालेली आहे. राज्यातील अनेक ग्रामीण भागात नंबर प्लेट बसवण्याचे केंद्र उशिरा उघडण्यास सुरुवात झाली. राज्यातील बऱ्याच ठिकाणी फिटमेंट सेंटर बंद पडले असून, लोकप्रतिनिधी आणि जनतेने ही तारीख अपुरी पडत असून, मुदतवाढ करण्यास शासनाकडे विनंती केली होती.
HSRP न बसवण्याचे परिणाम
३० नोव्हेंबर तारखेनंतरही जर कोणी नंबर प्लेट बसवली नाही तर वाहन मालकांवर वायुवेग पथकानुसार कारवाई केल्या जाईल. ३० नोव्हेंबर पूर्वी अर्ज केला असेल. परंतु, HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी केंद्राने तारीख दिली असेल तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट सांगितले.
HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण(Transfer), कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे यावर निर्बंध घालण्यात आले असून, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण (License Renew) इत्यादी कामे HSRP नंबर प्लेट बसावण्या पर्यंत थांबवले जाणार. परंतु, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण हे काम करता येईल, अशी माहिती विवेक भिमनवार परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिली.
जयंत पाटील यांनी मुदतवाढ मागितली
राज्यातील hSRP संदर्भातील मुदतवाढ 15 ऑगस्ट रोजी संपत असून, बऱ्याच लोकांनी नंबर प्लेट बसवलेली नाही. वाहनधारकांना नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रयत्न करत असून, तांत्रिक अडचणी आणि किचकट प्रक्रियेमुळे त्यांना अडचण जात आहे. परिवहन विभागाने दिलेल्या आकड्यानुसार राज्यातील ७०% वाहनधारकांनी HSRP प्लेट बसवलेल्या नाहीत. त्यामुळे १०००० चा भुर्दंड न देता शासनाने मुदतवाढ द्यावी,आमदार जयंत पाटील यांनी अश्या आशयाचे एक्स वर पोस्ट शेअर करत शासनाला विनंती केली.

0 टिप्पण्या