Hot Posts

6/recent/ticker-posts

"रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाचा जादू कायम" "दोन दिवसांत चित्रपटाने कमावले १०९ कोटी"

 




साऊथ चे सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते राज्यात देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात आहेत. नुकताच त्यांचा कुली हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, चाहत्यांना उत्सुकता लागलेली होती. आता ती संपलेली असून चाहते सिनेमागृहात गर्दी करायला लागले आहेत. चित्रपट 14 ऑगस्ट गुरुवार रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात मुख्य भूमिकेत सुपरस्टार रजनीकांत असून, त्यांच्या विरोधात तेलगू सिनेमाचे प्रसिद्ध सिने अभिनेते नागार्जुन आणि बॉलिवूड चे MR. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे आमिर खान यांच्यासह दक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासन, सौबिन शाहीर, उपेंद्र, श्रुती हासन, सत्यराज आणि रचिता राम आणि पूजा हेगडे खास भूमिकेत आहेत.


          




 चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कानाग्राज आणि निर्माते कलानीठी मारण (Sun Pictures) आहेत. चित्रपट तमिळ, तेलगू, मलयाळम, कन्नड आणि हिंदी या भाषेत प्रदर्शित झालेला आहे. चित्रपट अंदाजे जवळपास  ४०० कोटी रुपये बजेट ने तयार झाला आहे. 

      सॅकनिल्क रिपोर्ट्स नुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने ६५ कोटी बॉक्स ऑफिस वर कलेक्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४४.०८ कोटी कलेक्शन केलं असून, एकूणच १०९.०८ कोटी कलेक्शन बॉक्स ऑफिस वर केलेलं आहे. तर याच दिवशी प्रदर्शित झालेल्या वॉर २ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५१.०५ कोटी रुपये बॉक्स ऑफिस वर कमावले. तर, दुसऱ्या दिवशी ५६.५० कोटि रुपयेचा गल्ला जमवला. दोन दिवसांत एकूणच १०८ कोटी रुपये वॉर २ ने कमावले. 

     रजनीकांत यांच्या कुली चित्रपटाची टक्कर ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर व कियारा आडवाणी यांच्या वॉर २ चित्रपटा सोबत होत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट एकच दिवशी प्रदर्शित सिनेमागृह येथे चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. रजनीकांत यांचा कुली हा चित्रपट अजून बॉक्स ऑफिस वर कीतीचा गल्ला गोळा करतो. हे पाहण्यासारखे असेल. 

 चित्रपटाने जादू कायम ठेवण्यात यश मिळवले असून, चित्रपट बॉक्स ऑफीस वर किती कलेक्शन करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


     

         

             

             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या