Hot Posts

6/recent/ticker-posts

"लाडकी बहिण योजनेत अपात्र ठरवल्याने बसपा चे आंदोलन"


नागपूर, 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत 61,146 अपात्र ठरवण्यात आले. या मागणी विरोधात   बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार  यांच्या नेतृत्वाखाली  संविधान चौक येथे एक दिवसीय धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले. 

        

    याप्रसंगी बोलतांना योगेश लांजेवार म्हणाले , "नागपूर जिल्ह्यात 5,80,413 लोकांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. परंतु, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच ६१,१४० लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले असून, हे कितपत योग्य आहे. सरकारने ६१,००० लाडक्या बहिणींचे मन दुखावले असून, निवडणुकीपूर्वी अनेक जणांनी फॉर्म भरले तेव्हा सगळ्यांना पैसे देण्यात आले. त्यावेळेस सर्व पात्र होते आणि निवडणूक होताच सगळेच अपात्र असा सवाल करत त्यांनी सरकार ला धारेवर धरले. 




      "विधानसभा निवडणुकीत जवळपास ६ लाख कुटुंबाचे मतदान घेतले. परंतू , अपात्र लाभार्थी बहिणींना पात्र घोषित करण्यात आले असून, या योजनेखाली शासन आणि प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ पुरुषांनी सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. ज्या अधिकाऱ्यांनी या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर सरकार तर्फे कारवाई करण्यात यावी", असेही ते म्हणाले.

       सरकार निष्काळजीपणे कार्य करते त्यामुळे सरकारने हातात बांगड्या घालाव्या अश्या घोषणाबाजी करत सरकारला बांगड्या दाखवल्या.



 याप्रसंगी राज्याचे महासचिव मंगेश ठाकरे,नागपूर जिल्हा प्रभारी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब, राजकुमार बोरकर,सौ. रंजनाताई ढोरे, सौ. मायाताई उके, सौ. ताराबाई गौरखेडे, सौ. सुनंदाताई नितनवरे, इब्राहिम टेलर, कल्पेश पाटील, चंद्रगुप्त रंगारी, रामभाऊ कुर्वे, यशवंत निकोसे, सौ. विमल ताई इंगळे, संजय जैस्वाल, अजय उके, मोहम्मद जलालुद्दीन, संघर्ष वानखेडे, सुबोध साखरे,रूप राव नारनवरे, भंते संघरत्न, निखिल नंदेश्वर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


   

          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या