Hot Posts

6/recent/ticker-posts

" आधी आंदोलनकर्त्याच्या कमरेत पोलिस उपअधीक्षकाने घातली लात " " आता दिलं स्पष्टीकरण " " जालना जिल्ह्यातील घटना " " प्रकरण काय ? जाणून घ्या"

 


काल स्वातंत्र्य दिनी पोलीस उपअधीक्षकाने आंदोलनकर्त्याच्या पृष्ठभागावर लात घायल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होता.


जालना:- 


स्वातंत्र्य दिनानिमित्त काही मागण्या घेऊन जनप्रतिनिधी यांच्या कडे घेऊन जात असतानाच पोलिसांनी रोखले. पालकमंत्री पंकजा मुंडे जालना जिल्ह्यात आले होते. त्यानिमित्त त्यांना भेटून प्रश्न मांडता येईल या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू असलेल्या उपोषणस्थळ वरून उठून पालकमंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याच्या कुटुंबासमवेत त्याला मध्येच अडवले. पोलिस लहान मुलीला सुद्धा धरून असल्याचे दिसत आहे. त्याच क्षणी पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी धावत येत आंदोलकाच्या पृष्ठ भागावर जोरदार लात घातली. गोपाळ चौधरी असं त्या युवकाचा नाव आहे. पोलीस अधिकाऱ्याचा लात घालण्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. तक्रारदारा नुसार त्याच्या पत्नीने पळून जाऊन पर पुरूषासोबत लग्न केलं मात्र तक्रार देऊन सुद्धा पोलिस कारवाई करत नसून पैसे खाल्ल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. 

     समाज माध्यमांवर व्हायरल होताच अनेकांनी याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. 

       






             आमदार  रोहित पवार म्हणाले

"खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एकवेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करुनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कंबरेत DYSP अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा"  


                ॲड. अरुण जाधव म्हणाले 

  जालना येथे काल दुर्दैवी घटना घडलेली आहे. रक्षक भक्षक बनलेले आहेत. एक तरुण कार्यकर्ता कौटुंबिक न्यायासाठी बऱ्याच दिवसापासून जालना येथे आंदोलन करत होता. काल स्वातंत्र्य दीन असल्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे जालना येथे येणार होत्या. त्यांना भेटून न्यायाची मागणी करण्यासाठी जात असताना पोलिसांनी उचलून घेऊन त्याला लाता घातल्या. पोलिसांच्या या कृत्यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे. परभणीचे मृत सोमनाथ सूर्यवंशी यांची काय अवस्था यांनी केली असेल. 

स्वातंत्र्यदिनी एका आंदोलनकर्त्यांची धिंड काढून त्याला मारहाण केली त्याला तुम्ही न्याय देणार का? संबंधित अधिकारी वरती  कारवाई होणार का? असा प्रश्न सरकारला विचारला. 

     ॲड. अरुण जाधव हे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आहेत. 



    पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी 

                 यांचे स्पष्टीकरण

गोपाळ चौधरी या नावाचे तक्रारदार आहे. त्याची पत्नी निघून गेली असून, तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलं आहे. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करूनही त्यांचा हट्ट आणि दुराग्रह संपत नव्हता. त्यांची मागणी माझ्या पत्नीला आणून द्यावी अशी आहे. त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसले. प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते तसच निवेदन दिलेले होतं. आम्ही त्यांच मतपरिवर्तन करण्यासाठी पोलिस स्टेशन ला आणलेलं होतं. पोलीस स्टेशन ला उपस्थित अधिकाऱ्यांवर त्याने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला आणि तिथून ते निघून गेले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर आल्या नंतर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते खूप आक्रमक झाले होते एकून घेण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते. त्यांनी महिला कर्मचारीच्या अंगावर रॉकेल टाकलं, त्यामुळे आम्हाला बाळाचा वापर करावा लागला

          


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या