Hot Posts

6/recent/ticker-posts

"राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी चे उमेदवार जाहीर" " सि पि राधाकृष्ण उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार "

 


राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडी (NDA) ने तामिनाडू मधील राजकारणी व सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून केली आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचे कारण सांगत राजीनामा दिला होता.सर्वांना आश्चर्याचा धक्का देत राजीनामा दिला होता. त्यामुळे ती जागा रिकामी झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने काही दिवसांतच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार भाजप प्रणित रा.लो.द.(NDA) ने उमेदवार जाहिर केला आहे. निवडणूक 9 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. 

            






       कोण आहेत सी पी राधाकृष्णण ?

सी पी राधाकृष्णन यांचा जन्म तामिनाडूमधील तिरुप्पुर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रपूरम पोंनुसामी राधाकृष्णन आहे. 17 व्या वर्षापासून, राधाकृष्णन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी 2023 ते 2024 या कालावधीत काम पाहिले. तेलंगणाचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी कार्यरत आहेत. 


       कशी झाली राजकारणाची सुरुवात? 

 जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समिती मध्ये 1974 ला त्यांची निवड करण्यात आली. राधाकृष्णन यांनी लोकसभा निवडणूक 1998 ला कोइंबतूर या मतदासंघातून द्रमुक(DMK)चे उमेदवार रामानाथण यांचा पराभव करत जिंकला होता. अण्णाद्रमुक पक्षाशी युती केल्यानंतर तामिळनाडूमध्ये विजयी झालेल्या भाजपच्या तीन उमेदवारांपैकी ते एक होते. DMK ने रा.लो.द. (NDA) सोबतचे सगळे संबंध तोडल्यानंतर AIADMK शी युती करण्या मध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. 2004 ते 2006 दरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 

९३ दिवसांसाठी त्यांनी तामिनाडू राज्यात रथ यात्रा काढली होती. भारतीय नद्यांना जोडण्याचे समर्थन करणे, अस्पृश्यता निर्मूलन करणे आणि भारतातील दहशतवादाविरुद्ध मोहीम चालवणे असा त्यांचा मानस होता.   




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा 


थिरु सीपी राधाकृष्णन जी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडल्या बद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा . त्यांची दीर्घकाळची सार्वजनिक सेवा आणि विविध क्षेत्रातील अनुभव आपल्या देशाला समृद्ध करेल. त्यांनी नेहमीच दाखवलेल्या समर्पणाने आणि दृढ निश्चयाने ते देशाची सेवा करत राहोत अशी प्रार्थना.






      अमित शहा यांनी दिल्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून नामांकन मिळाल्या बद्दल महाराष्ट्राचे  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन.

       संसद सदस्य म्हणून आणि विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून तुमच्या भूमिकांनी घटनात्मक कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तुमचा प्रचंड अनुभव आणि ज्ञान वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा वाढवेल आणि नवीन टप्पे गाठेल याची मला खात्री आहे.

            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या