संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून मग्रुरी अपेक्षित नसून, अहंकार भाजपच्या हस्तकां कडून अपेक्षित आहे. त्यानुसार, निवडणूक आयुक्त विरोधी पक्षाशी वागले आहेत. शपथपत्र राहुल गांधीं कडून मागितले असून, देशाची 80 कोटी जनता शपथपत्र द्यायला तयार आहे. निवडणूक आयुक्त ज्या पक्षाची वकिली करत आहेत, त्याच भाजप पक्षाचे अनुराग ठाकूर व अन्य काही लोकांनी राहुल गांधी प्रमाणेच कुठल्या मतदार संघात किती लाख मतांची चोरी झाली असा आरोप जर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर करणार असेल तर निवडणूक आयुक्त केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना शपथपत्र मागण्याची हिंमत करणार आहे का ? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारला असून, राहुल गांधी यांनी जे प्रश्न निवडणूक आयोग समोर उपस्थित केले, त्या एकाही प्रश्नाला निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलेले नसून, ही मग्रुरी निवडणूक आयोगाची आहे , असा मोठा आरोप शिवसेना ऊबाठा नेते संजय राऊत यांनी केला.
पुढे म्हणाले, "महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना NDA आघाडी तर्फे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गेले वर्षभर ते अत्यंत शांतपणे काम करत आहेत. राजकारणातील सरळमार्गी व्यक्ती असून, तामिळनाडू मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजप ला रुजविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. भाजप मध्ये त्यांनी अनेक पद भूषवली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी असताना ही त्यांना संधी मिळत आहे त्याच्याबद्दल आनंद आहे. संवैधानिक पदावर त्यांची निवड होते तेव्हा त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो"
सी पी राधाकृष्णन NDA चे उमेदवार असून, शिवसेना इंडिया आघाडीचा घटकपक्ष आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाबाबत काय भूमिका घ्यावी याबाबत बैठकीत चर्चा केली. काँग्रेस चे नेते वेणुगोपाल यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या सोबत संपर्क साधून उपराष्ट्रपती पदाबाबत काही विषयांशी चर्चा केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबर मध्ये काही वेळात बैठक होणार आहे. शिवसेनेची भूमिका स्वतंत्रपणे असणे मला गरजेचे वाटत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
0 टिप्पण्या