Hot Posts

6/recent/ticker-posts

"काँग्रेसला खरंच लढायचं आहे का " "वंचितचा संतप्त सवाल"







 वंचित बहुजन आघाडी च्या वतीने काँग्रेसला संतप्त प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र विधानसभा २०२४ चा निवडणूक निकाल लागल्या पासून निवडणुक चर्चेचा विषय ठरत आलं आहे. वंचित बहुजन आघाडीने संध्याकाळी ६ वाजल्या नंतर ७६ लाख मतदार कसे काय वाढले असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सह इतर विरोधी पक्षांना एकत्र येत न्यायालयीन लढा देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी अनेकदा काँग्रेस ला न्यायालयीन लढा मिळून लढण्यासाठी पत्रव्यवहार केला. आता त्यांनी खटाखट चार प्रश्न काँग्रेसला विचारत जाब विचारला आहे. 

१. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना निवडणुकीत झालेल्या घोटाळ्या विरोधात एकत्रित येऊन लढण्याचे आवाहन केलं तरी पण गप्प का राहिले?

२. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७६ लाख फेरफार प्रकरण विरोधात मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत आवाहन केलं तरी तुम्ही गप्प का राहिलात? 

३. ७६ लाख आश्चर्यकारक मतदान वाढलेत तेव्हा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत उत्तर मागितलं, तेव्हा तुम्ही गप्प का राहिलात? 

४. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात ७६ लाख व्होटिंग फेरफार प्रकरणात याचिका दाखल केली तेव्हाही तुम्ही गप्प का राहिलात?

       असे प्रश्न  वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला एक्स वरून विचारले. 

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहीत म्हटले होते की, "महाराष्ट्रात वाढेलेले ७६ लाख व्होटिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या गेलेल्या याचिका मध्ये तुम्ही पण हस्तक्षेपकर्ता होऊ शकता. अश्या आशयाचं पत्र त्यांनी समाज माध्यामांवर पोस्ट केलं होतं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या