"रायगड जिल्ह्यात ५०,००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा" " संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत केला आरोप "


  

रायगड जिल्ह्यात सिडको आणि शहरी विकास मंत्री यांनी ५०,००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केला असा मोठा  आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहीत केला आहे. 

  



 रायगड जिल्ह्यातील ४०७८ एकर सरकारी अंतर्गत वन जमीन बेकायदेशीर रित्या बिवलकर कुटुंबाला हस्तांतरित केलं आहे. ३० वर्षांसाठी अपात्र असलेल्या बिवलकर कुटुंबाला १२.५ % जमीन वाटप योजने अंतर्गत शहरी विकास मंत्री आणि सिडको अध्यक्ष यांनी पात्र ठरवले असून, एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी हस्तांतरण सुलभ व्हावी यासाठी केवळ २५ दिवसांसाठी नियुक्ती केली, त्या काळात जमीन वाटप घाईघाईने पूर्ण झाले. महाराष्ट्र शहरी विकास विभाग आणि सिडको ५०,००० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात सहभाग आहे, असा आरोप शिवसेना ऊबाठा नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत केला. 




       सिडकोच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांना वाटप योजनेमुळे वंचित रहावे लागत आहे. सिडकोचे अधिकारी यांना लाज उरली नसून, वंचित कुटुंबासाठी जमिनी उपलब्ध नाही असा  दावा करतात. परंतु, बिवलकर कुटुंब या योजनेसाठी पात्र नसताना सुद्धा ५०,००० कोटी रुपयांची जमीन वाटप करण्यात आले. कुटुंब पात्र नसताना सुद्धा २०,००० कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 


     घोटाळ्यात सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि सिडको अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मी शिंदे आणि शिरसाट यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आणि या ५०,००० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा अशी मागणी करतो, अश्या आशयाचे पत्र लिहीत त्यांनी एक्स वर पोस्ट केलं. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या