Hot Posts

6/recent/ticker-posts

" बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार " "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली घोषणा "

 

बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केले जाहीर.



बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा इंडिया आघाडीच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. आज नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत त्यांचे नाव काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडी तील घटक पक्षांच्या उपस्थितीत रेड्डी यांचे नाव जाहीर केले. माजी उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांनी तब्येतीचे कारण देत राजीनामा दिल्याने ही जागा रिकामी झाली. त्याच्या काही दिवसांतच केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहिर केली होती. राष्ट्रिय लोकतांत्रिक आघाडी (NDA) चे उम्मदेवर सी पि राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी  राजकीय लढत होणार असून, 9 सप्टेंबर ला निवडणूक पार पडणार आहे. त्यावेळी कोण बाजी मारणार हे कळेल. 




            कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी ?


बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म तत्कालीन आंध्र प्रदेश राज्यात व आताचे तेलंगणा राज्य मध्ये अकुला म्यालारम रंगा रेड्डी जिल्ह्यात झाला. 

बी सुदर्शन रेड्डी भारतीय न्यायाधीश म्हणून ओळखले जातात. देशाचे माजी राष्ट्रपती दिवं. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायलयाच्या न्यायाधीशपदी केली होती.  

१२ जानेवारी २००७ ते ७ जुलै २०११ या कालावधीत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. तत्पूर्वी त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदही भूषविले. 


        राहुल गांधी यांनी दिल्या शुभेच्छा


"भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून नामांकन मिळाल्या बद्दल बी. सुदर्शन रेड्डी गरू यांचे हार्दिक अभिनंदन करतो. एक प्रतिष्ठित कायदेपंडित आणि न्यायाचे समर्थक, ते आपल्या संविधानाच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात - लोकांचे हक्क, समानता आणि आपल्या लोकशाहीचे रक्षण करतात. या वैचारिक लढाईत आम्ही एकजूट आहोत आणि त्यांना शुभेच्छा देतो."

   

  काही दिवसांपूर्वी बैठकी च्या आदल्या दिवशी आम आदमी पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.  आम आदमी  पक्षाने पाठिंबा बी सुदर्शन रेड्डी यांना अधिकृत रित्या जाहीर केलेला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर केले. NDA आणि इंडीया आघाडी चे उमेदवार आता दक्षिणात्य राज्यातील आहेत हे आता निश्चित झाले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या