Hot Posts

6/recent/ticker-posts

" 3 इडियट्स चे प्रोफेसर कालवश" "वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास"

 



अच्युत पोतदार 3 इडियट्स चित्रपटात प्रोफेसर या पात्राची भूमिका साकारली. त्यांनी ९१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप. 





सिने अभिनेते व 3 इडियट्स फेम अच्युत पोतदार यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन वृद्धापकाळाने झाले असून, त्यांच्या जाण्याने बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्री वर शोककळा पसरली आहे. 

      



    कशी झाली अभिनेते म्हणून सुरुवात

अच्युत पोतदार यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला. 1961 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्या नंतर त्यांची नियुक्ती मध्य प्रदेशच्या रेवा येथे प्राध्यापक म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी काही काळ भारतीय लष्कर मध्ये काम केले आणि 1967 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. 25 वर्ष इंडियन ऑईल येथे कार्यकारी पदावर काम केले आणि 1992 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. अभिनयाला त्यांनी छंद म्हणून बघितला आणि जोपासला सुद्धा. दिग्दर्शक विधू विनोद चोपडा यांच्या चित्रपटात ते निश्चित पात्र होते. 3 इडिएट्स मधील त्यांची प्रोफेसर मधली भूमिका आजही लोकांच्या मनामध्ये घर करून बसली आहे. त्यांचा डायलॉग "कहना क्या चाहते हो" आजही लोकं अनेक ठिकाणी गंमत म्हणून वापरत असतात.



                     सिनेसृष्टीत योगदान काय? 


अच्युत पोतदार यांनी जवळपास १२५ बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ९५ मालिकांमध्ये काम केले असून, जवळपास ४५ जाहिराती मध्ये भूमिका साकारली आहे. आक्रोश, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, राजू बन गया जेंटलमन, दिलवाले, रंगीला, मृत्युदंड, इश्क, वास्तव, हम साथ साथ हैं, परिणीता, लगे रहो मुन्ना भाई, दबंग 2, थ्री इडियट्स आणि व्हेंटिलेटर आणि फरारी की सवारी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

               किती मालिकांमध्ये साकारल्या भूमिका

चित्रपटां शिवाय अच्युत पोतदार यांनी मालिकां मध्ये सुद्धा काम केलं आहे. "वागले की दुनिया', 'माझा होशिल ना', 'मिसेज तेंदुलकर' आणि 'भारत की खोज" या मालिकां मध्ये सुद्धा भूमिका साकारल्या आहेत. 


                स्टार प्रवाह ने वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच स्मित, साधेपणा आणि प्रत्येक भुमिकेतली प्रामाणिकता सदैव स्मरणात राहील. अशी पोस्ट इंस्टाग्राम वर लिहित श्रद्धांजली वाहिली.


             झी मराठी ने वाहिली श्रद्धांजली 

अच्युत पोतदार यांना झी मराठी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. अशी पोस्ट झी मराठी ने इंस्टाग्राम वर  केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या