Hot Posts

6/recent/ticker-posts

"महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी होणार" " केंद्र सरकारचा निर्णय "

  

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्या वरून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा 200 वा जयंती दिन राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा जाहीर केले. लाल किल्ल्या वरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "महात्मा ज्योतिबा फुले यांनी दाखवलेला मार्ग आमच्यासाठी प्रेरणा असून, मागासवर्गीय लोकांना प्राथमिकता देण्याचं आमच्या सरकारने ठरवलेलं आहे. आम्हाला परिवर्तनाच्या उंचीला प्राप्त करून  मेहनतीचे शिखर गाठायची आहे. पारदर्शी धोरण ठेऊन या देशातील मागासवर्गीय लोकांच्या आयुष्यात उतरविण्याचा आमचा मानस आहे". अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. 





      छगन भुजबळ यांनी मानले आभार 


         "भारताच्या सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आणि स्त्री-शिक्षणाचे जनक महात्मा जोतीबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त विशेष राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याची ऐतिहासिक घोषणा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून केली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ही घोषणा समानता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि प्रगती या मूल्यांप्रती असलेल्या सरकारच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. या निर्णयामुळे जोतीबांनी दाखवलेल्या शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद निर्मूलन आणि शेतकरी कल्याणाच्या वाटचालीतून आजचा नवा भारत सशक्त होत आहे.

  महात्मा जोतीबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त भव्य द्विशताब्दी वर्ष कार्यक्रमांच्या आयोजना मुळे नव्या पिढीला महात्मा फुलेंच्या आदर्शांचा वारसा जाणून घेता येईल, प्रेरणा मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची शक्ती निर्माण होईल, यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आणि केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार." अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी एक्स वर पोस्ट करत केंद्र सरकारचे आभार मानले. 

      महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 वी जयंती देशभरात साजरा करा या मागणीचे पत्र केंद्र सरकार ला  लिहीत मंत्री छगन भुजबळ यांनी मागणी केली होती . याबद्दल त्यांनी स्वतः एक्स वर पोस्ट करून माहिती दिली.




          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या